शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

खरी पारदर्शकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2015 23:36 IST

‘चला बरे झाले, एका प्रकरणातून तर मान सुटली’ हा छगन भुजबळ आणि त्यांच्या चाहत्यांना वाटणारा आनंद क्षणैक ठरविणाऱ्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे सरकार किती पारदर्शक आहे

‘चला बरे झाले, एका प्रकरणातून तर मान सुटली’ हा छगन भुजबळ आणि त्यांच्या चाहत्यांना वाटणारा आनंद क्षणैक ठरविणाऱ्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे सरकार किती पारदर्शक आहे याची साक्षदेखील या निमित्ताने मिळून गेली आहे. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या उभारणीमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून भुजबळ यांनी बऱ्याच अनियमितता केल्या असा विद्यमान युती सरकारचा वहीम आहे आणि त्यासाठीच हे प्रकरण सरकारने लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे सुपूर्द केले आहे. या विभागाने बहुधा आपले काम सोपे व्हावे म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याकडेच चौकशीचा अहवाल मागितला व त्यांनी तोही दिला आणि त्यात भुजबळांना म्हणे क्लीन चिट दिली. मुख्यमंत्री म्हणतात तसे काहीही झाले नाही. पण दुसऱ्याच वाक्यात ते असेही म्हणतात की एखाद्या विभागाने काही मत मांडले म्हणजे सरकारने ते स्वीकारलेच असे होत नाही. येथे एखादा विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम खाते असा संदर्भ असेल तर त्या खात्याने भुजबळांना स्वच्छतेचा दाखला दिला होता पण सरकारला तो मान्य नाही असा त्याचा अर्थ होतो. मुळात खातेअंतर्गत जो व्यवहार झाला आणि विशेषत: एका माजी मंत्र्यांवरील गैरव्यवहाराच्या चौकशीच्या संदर्भात तो झाला त्यावर सरकारी भाषेत ‘गोपनीय’ हा टॅग असणारच. मग या गोपनीयतेचा भंग होऊन बांधकाम विभागाच्या ‘मतप्रदर्शना’ला पाय कसे फुटले हा खरे तर मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने गांभीर्याने शोध घेण्याचा विषय ठरतो. सरकारी कारभारात काही बाबी किमान निष्कर्षाप्रत पोहोचेपर्यंत तरी गोपनीयच ठेवाव्या लागतात. त्यात युती सरकारने काही संशोधन केले असल्यास ठाऊक नाही. पण त्याहून महत्वाचे म्हणजे भुजबळ केवळ एकाच प्रकरणात फसलेले नाहीत हे आजवर सरकारच्याच विविध बड्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीवरुन दिसून येते. भ्रष्टाचाराचे निर्मूलन हा भाजपा सरकारचा प्राथम्यक्रम असल्याचेही सांगितले जाते. मग सरकारच्या नजरेत जे जे दोषी आहेत त्यांच्यारिुद्धच्या चौकशा अशा रखडतात कशापायी?