अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सची महिला पायलट कॅप्टन क्रॅस्टन विल्सन यांची रंजक कहाणी सध्या लोकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ही कहाणी म्हटलं तर तशी सर्वसामान्य, पण नंतर तिनं अनेक वळणं घेतली आणि आज कॅप्टन क्रॅस्टन विल्सन यांचं नाव सर्वतोमुखी आहे. महिला पायलट क्षेत्रात त्यांनी अतिशय नाव कमावलं आहे.
क्रॅस्टन सध्या ज्या पदावर पोहोचल्या आहेत, ती केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर अनेक महिलांसाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. कारण या एअरलाइनच्या शंभर वर्षांच्या प्रवासात आजपर्यंत कोणतीही महिला या पदापर्यंत पोहोचली नव्हती. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात आजही महिला पायलटांचं प्रमाण फक्त सहा टक्के इतकंच आहे. अशा परिस्थितीत क्रॅस्टनचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. त्यांची ही अनोखी कहाणी सिद्ध करते, निर्धार मोठा असेल, मनगटात ताकद असेल, कुठल्याही परिस्थितीला हार न मानण्याची हिंमत असेल, तर या क्षेत्रातील कॉलेजची कोणतीही पदवी नसतानादेखील केवळ कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्हाला या पदापर्यंत पोहोचता येतं आणि वर्षाला सुमारे चार कोटी रुपये (चार लाख डॉलरपेक्षा अधिक) पगारही मिळवता येतो!
क्रॅस्टनच्या प्रवासाची सुरुवात वयाच्या नवव्या वर्षी झाली, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा विमानाच्या खिडकीतून जग पाहिलं. त्या सांगतात, ‘तेव्हा माझे वडील मला फोटोग्राफीसाठी छोट्या विमानप्रवासावर घेऊन गेले होते. त्या दिवशी अत्यानंदानं मी खूप हसत होते. वडिलांनी मला माझ्या आनंदाचं कारण विचारलं तेव्हा मी अगदी सहज आणि स्पष्ट सांगितलं, मोठं झाल्यावर मी हेच काम करणार आहे!
पण मुलींसाठी पायलट होण्याचा रस्ता सोपा नाही, हे कळल्यानंतरही क्रॅस्टननं हार मानली नाही. क्रॅस्टननं कॉलेजमध्ये शिकत असतानाच उड्डाणाचं प्रशिक्षण सुरू केलं. स्टुडंट पायलट सर्टिफिकेट, प्रायव्हेट पायलट लायसन्स आणि इतर उड्डाण प्रमाणपत्रं मिळवली. विशेष म्हणजे यासाठी त्यांना कोणत्याही पारंपरिक पदवीची गरज पडली नाही. त्यांचे ‘फ्लाइंग अवर्स’च हीच त्यांची खरी पदवी ठरली.
क्रॅस्टन सांगतात, नोकरीसाठी पहिल्यांदा अर्ज करताना मी अतिशय साशंक होते. कारण तोपर्यंत कोणत्याच मुलीचं त्यासाठी सिलेक्शन झालेलं नव्हतं. पण वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांची हिंमत आणि कर्तृत्वानं त्यांना विमानाच्या कॉकपिटपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर को-पायलट, पायलट असा प्रवास करत गेली ३१ वर्षं त्या कॅप्टन म्हणून काम करीत आहेत.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी पायलट बनायचं स्वप्न पाहिलं, विमान उड्डाण क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना बाविसाव्या वर्षी त्या कॉकपिटपर्यंत पोहोचल्या आणि आज वयाच्या ६४व्या वर्षी जगातील दिग्गज युनायटेड एअरलाईन्सच्या १८ हजार पायलटमध्ये त्या सर्वांत सीनिअर महिला पायलट आहेत. आज त्या बोइंग ७८७ उडवतात आणि महिन्यातील सुमारे बारा दिवस विमानप्रवासात असतात.
Web Summary : Captain Craston Wilson, a United Airlines pilot, defied odds. Driven by a childhood dream, she became the first woman in the airline's history to achieve this senior pilot role, proving passion and hard work triumph over traditional degrees.
Web Summary : यूनाइटेड एयरलाइंस की पायलट कैप्टन क्रैस्टन विल्सन ने बाधाओं को पार किया। बचपन के सपने से प्रेरित होकर, वह इस वरिष्ठ पायलट पद को प्राप्त करने वाली एयरलाइन के इतिहास में पहली महिला बनीं, जिससे साबित होता है कि जुनून और कड़ी मेहनत पारंपरिक डिग्री पर विजय प्राप्त करती है।