शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

संघशिस्तीची लिटमस टेस्ट

By admin | Updated: December 22, 2015 02:17 IST

भारतीय जनता पक्षाने पक्षशिस्तीची नवी व्याख्या तयार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील बौद्धिक वर्गात गैरहजर राहिलेल्या भाजपाच्या २२ आमदारांना परवा शिस्तभंगाची नोटीस देण्यात आली.

भारतीय जनता पक्षाने पक्षशिस्तीची नवी व्याख्या तयार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील बौद्धिक वर्गात गैरहजर राहिलेल्या भाजपाच्या २२ आमदारांना परवा शिस्तभंगाची नोटीस देण्यात आली. तिच्यामुळे हे आमदार हादरले आहेत. साधनशुचिता मानणाऱ्या भाजपाची पक्षशिस्तीची व्याख्या पूर्वी थोडी वेगळी होती. चारित्र्यसंपन्नता, निर्व्यसन, राष्ट्रभक्ती ही मूल्ये पक्षशिस्तीत गणली जायची. सत्तेत आल्यानंतर मात्र पक्षशिस्तीचे नवे मापदंड आकारात आले. भाजपाचा नेता-कार्यकर्ता चारित्र्यसंपन्न व निर्व्यसनी असावा हा आग्रह आता राहिलेला नाही. त्याच्या राष्ट्रभक्तीचा पुरावाही कुणी मागत नाही. भाजपाची संघ पुरस्कृत संस्कृतीरक्षणाची मूल्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वाहत गेली. सत्तेत येण्यासाठी भाजपाने संघाच्या मूल्यांना जाणीवपूर्वक मूठमाती देत सत्तेच्या सोयीची नवी व्याख्या निर्माण केली. संघाला आता ती बदलवायची आहे आणि त्यातूनच स्वत:ची पक्षावरील पकड आणखी घट्ट करायची आहे. बौद्धिक वर्गाला गैरहजर राहिल्याचे निमित्त साधून भाजपाच्या २२ आमदारांना मिळालेली ‘पक्षशिस्तभंगाची’ नोटीस हा त्याचाच एक भाग आहे. भाजपात असलेल्या पण संघाच्या असहिष्णू सावलीपासून दूर राहू पाहणाऱ्या मंत्री-आमदारांना दिलेला तो इशाराही आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे या पक्षावरील वर्चस्व कधी नव्हे तेवढे वाढलेले आहे. मंत्री-आमदारांचा स्वीय सचिव कोण असावा हेदेखील संघच ठरवितो. संघ पदाधिकाऱ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही याची काळजी भाजपा आमदारांना कसोशीने घ्यावी लागते. परवा संघाच्या बौद्धिक वर्गात भाजपाचे १३९ पैकी ११७ आमदार हजर होते. उर्वरित २२ आमदारांना या वर्गाचे महत्त्व कळले नसावे. कित्येकदा पक्षाच्या बैठकांना आमदार उपस्थित राहात नाहीत. पण त्यांना कधी शिस्तभंगाची नोटीस दिली जात नाही. भाजपाच्या मंत्री-आमदारांसाठी सर्वात अपमानास्पद बाब म्हणजे या बौद्धिक वर्गात उपस्थितांची हजेरी घेण्यात आली. यातून संघाला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? भाजपाच्या मंत्री-आमदारांमध्ये आपल्याबद्दल भय आणि दहशत निर्माण व्हावी यासाठी संघ अधूनमधून अशा ‘लिटमस टेस्ट’ करीत असतो. संघाच्या बौद्धिक वर्गाला गैरहजर राहणे हा पक्षशिस्तभंग होत असेल, तर भाजपा लोकप्रतिनिधींच्या इतर गंभीर चुका मग फारच क्षम्य आणि सौम्य ठरतात. यातील विनोद असा की, ज्यांच्या सहीने ही नोटीस काढण्यात आली ते पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित हे अलीकडच्या काळातील शिस्तभंगाचे ‘मेरूमणी’ आहेत. हेच पुरोहित आपल्याच नेत्यांबद्दल गरळ ओकत असल्याचे काही दिवसांपूर्वी कॅमेऱ्यांत बंद झाले होते. भाजपाचे एक मंत्री कंबरेला पिस्तूल लावून मतिमंद मुलांच्या शाळेत जातात. पण या ‘पिस्तुल्या’ मंत्र्याला नोटीस देण्याचे आदेश संघाने दिल्याचे ऐकिवात नाही. भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याला या वयातही ‘हिरव्या देठा’चे आकर्षण असते आणि ते तसे जाहीरपणे मोकळेही होतात. त्यावेळी संघ त्यांना खडसावत नाही. पूर्व विदर्भातील एक आमदार सार्वजनिक कार्यक्रमात दारू पिऊन असतात पण या दारुबाज आमदाराच्या मर्कटलीलांना वेसण घालण्याची हिंमत संघ कधीही दाखवत नाही.
संघाच्या बौद्धिकाला दांडी मारणाऱ्यांना दिलेली नोटीस हे संघाने शोधलेले एक निमित्त आहे. या आडून संघाला भाजपा आमदारांचे कान पिळायचे आहेत. संघाच्या विजयादशमी सोहळ्यासाठी नागपुरातील सर्व भाजपा आमदारांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. सोहळ्याच्या आदल्या दिवशी संघाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ आमदारांकडे खाकी चड्डी, पांढरा शर्ट, काळी टोपी, काठी, मोजे घेऊन गेले होते. विजयादशमी सोहळ्यात या गणवेशात तुम्हाला यायचे आहे, असा संघश्रेष्ठींचा निरोप असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र काहींनी गणवेशाची सक्ती झिडकारून लावली. हा अपमान संघ पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला. त्याचाच हा प्रतिशोध म्हणायचा. पण प्रतिशोधाची ही मालिका पुढेही सुरूच राहणार आहे. भाजपा आणि संघ यांच्यातील हे नवे द्वंद्व आहे.
- गजानन जानभोर