शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

यमुनेच्या पाण्यात न्हाले ‘स्मार्ट’ पुणे

By admin | Updated: February 4, 2016 03:17 IST

यमुनेकाठी नियोजन झालेल्या स्मार्ट सिटी योजनेत मुळा-मुठेच्या तीरावरच्या पुण्याचे घोडे अखेर एकदाचे न्हाले. देशातील १०० शहरांच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाने झालेली निवड पुण्यासाठी गौरवाची,

यमुनेकाठी नियोजन झालेल्या स्मार्ट सिटी योजनेत मुळा-मुठेच्या तीरावरच्या पुण्याचे घोडे अखेर एकदाचे न्हाले. देशातील १०० शहरांच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाने झालेली निवड पुण्यासाठी गौरवाची, अभिमानाची बाब आहे. विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ख्याती होतीच. मागील काही वर्षांत एज्युकेशन हब, आयटी हब व आॅटो हब म्हणून या लौकिकात भर पडली. आता स्मार्ट सिटी योजनेतील निवडीने त्यावर कळस चढविला. महापालिका प्रशासनाने अहोरात्र केलेले परिश्रम त्यामागे आहेत. पुणेकरांनी या योजनेला दिलेला प्रतिसादही तितकाच लक्षणीय होता. पुणेकरांच्या या सहभागाचे जागतिक स्तरावर कौतुक झाले. जर्मनीच्या माजी अध्यक्षांनी लोकसहभागाचे हे मॉडेल त्यांच्या देशात वापरण्याची इच्छा व्यक्त केली. नागरिकांच्या या सहभागातूनच शहराच्या समस्यांचा प्राधान्यक्रम निश्चित झाला. त्यावरून पुण्याचा तीन हजार कोटी रुपयांचा विविध विकासकामांचा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला.क्षेत्रविकासासाठी औंध-बाणेर-बालेवाडी या परिसराची निवड, पायलट प्रोजेक्ट म्हणून तिथे राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक प्रवासासाठी विद्युत्वाहनांसारख्या अत्यंत आधुनिक स्वरूपाच्या विविध योजना, त्यासाठी फक्त तिथेच खर्च होणारे एक हजार कोटी रुपये, संपूर्ण शहरासाठी २४ तास पाणी योजना, आधुनिक तंत्राने घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ-प्रशस्त रस्ते, त्यावरची सुरक्षित वाहतूक, वाहनतळ, पदपथ सुरक्षा धोरण, असे बरेच काही स्मार्ट सिटीत असल्याचे सांगण्यात येत आहे. बील भरणे, बँकेतून पैसे काढणे, आवश्यक कामांच्या माहितीची देवाणघेवाण करणे अशा कामांसाठी विविध प्रकारची मोबाईल अ‍ॅप्स या प्रकारचा नव्या जगातील तंत्रज्ञानावर आधारित, असा हा विकास असेल.पुण्याचे आकर्षण देशातल्याच नाही, तर जगभरातील नागरिकाना आहे. असे पुणे ‘स्मार्ट’ होणार ही त्यांच्यासाठी अधिक आकर्षणाची गोष्ट आहे. खुद्द पुणेकर मात्र थोडा भांबावलेलाच आहे. केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या ‘सुविधा हव्या असतील, तर त्यासाठी जादा कर मोजावा लागेल’ या वक्तव्याने त्याच्या संभ्रमात भरच पडली. हा जादा कर कसा जमा करणार, औंध-बाणेर-बालेवाडीतील नागरिकानाही जास्त कर द्यावा लागणार का, या करांमुळे स्मार्ट सिटीमधील राहणे महाग होणार का, अशा अनेक प्रश्नांनी निर्माण झालेली संदिग्धता दूर होणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीचा कारभार स्वतंत्र कंपनीकडून (स्पेशल पर्पज व्हेईकल) होणार आहे. अशी कंपनी असणे नवे नाही; पण पीएमपी किंवा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, पुणे महानगर विकास प्राधिकरण या कंपन्यांची प्रशासकीय रचना व स्मार्ट सिटीच्या ‘एसपीव्ही’ची रचना यात फरक आहे. तिच्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे व अध्यक्षपदी सरकारी अधिकारी आहे. शिवाय, केंद्र सरकारचा एक प्रतिनिधीही संचालक म्हणून असणार आहे. त्यामुळेच नगरसेवकांनी सलग १४ तास या विषयावर मंथन केले. त्यांनी केलेला विरोध निव्वळ राजकारणासाठी आहे, असे समजणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. स्मार्ट सिटीमधील कामांसाठी खासगी कंपन्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नफ्याच्या हेतूने नाही, तर सर्वसामान्यांच्या हिताचे काही व्हावे म्हणून काम करणे अपेक्षित आहे. खासगी कंपन्यांचा सहभाग आल्यावर या मूळ तत्त्वालाच हरताळ फासला जाईल, अशी शंका व्यक्त होत असेल, तर तिचे निराकरण होणे गरजेचे आहे.महाराष्ट्रातून या योजनेसाठी पुणे व सोलापूर या दोन शहरांची निवड झाली आहे. काळ बदलत चालला आहे. बदल, रोज बदल हा नव्या जगाचा स्थायीभाव आहे. शंका असतील तर त्यांचे निराकरण होईल, प्रश्न असतील तर त्यांची उत्तरेही मिळतील; पण नव्या आधुनिक जगाशी स्वत:ला जोडून घ्यायचे असेल, तर हे बदल आनंदाने स्वीकारायला हवेत. स्मार्ट सिटीचे म्हणूनच स्वागत आहे.- विजय बाविस्कर