शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुनश्च ‘फील गुड’!

By admin | Updated: January 28, 2016 03:31 IST

केन्द्रातील रालोआच्या पूर्वीच्या राजवटीवर आधारित ‘फील गुड’च्या प्रचाराचा दणका या आघाडीने उडवूनदेखील देशातील मतदारांनी तो फारसा मनावर न घेऊन २००४च्या निवडणुकीत

केन्द्रातील रालोआच्या पूर्वीच्या राजवटीवर आधारित ‘फील गुड’च्या प्रचाराचा दणका या आघाडीने उडवूनदेखील देशातील मतदारांनी तो फारसा मनावर न घेऊन २००४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआला सत्तेवर आणले होते. तेव्हांच्या प्रचारातील फील गुडचा संदर्भ मतदारांशी होता. म्हणजे मतदारांना ‘गुड’ जाणवत असल्याचा रालोआ आणि खरे तर भाजपाचा दावा होता. पण अलीकडेच एका खासगी संस्थेने जे सर्वेक्षण केले आहे त्याचे निष्कर्ष खुद्द रालोआ आणि विशेषत: भाजपा आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना ‘गुड’ ‘फील’ व्हावे असे आहेत. सर्वेक्षणात देशातील ज्या लोकाना सहभागी करुन घेतले गेले त्यातील ४६ टक्के लोकांच्या मते म्हणे देशाचा सध्याचा कारभार ‘सरासरीपेक्षा खूपच वरचा’ आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ४६ टक्के लोक मोदी सरकारच्या कारभारावर खूष असताना त्याहून अधिक म्हणजे ५४ टक्के लोक खुद्द मोदी यांच्याच प्रेमात पडल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. तरीदेखील आजच्या या ‘फील गुड’ वातावरणात लोकसभेची निवडणूक पार पडली तर रालोआच्या आजच्या सदस्यसंख्येत ३८ जागांची घट होऊन ती ३०१ पर्यंत येईल असेही हे सर्वेक्षण सांगते. त्याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआच्या जागांमध्ये ४६ जागांची वाढ होईल असाही या सर्वेक्षणाचा एक निष्कर्ष आहे. म्हणजे ‘फील गुड’ येथेही आणि तेथेही! पण मोदी आणि त्यांच्या सरकारने खुशालून जावे अशी आणखीही एक बाब समोर आली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीत सध्या आघाडी प्राप्त केलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी एका चित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताची वारेमाप स्तुती केली आहे. ‘इंडिया इज डुईंग ग्रेट’ पण त्याची कोणीच चर्चा करीत नाही, असे या महोदयांनी म्हटले आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेन्द्र मोदी यांनी त्यांचे सारे लक्ष विदेश भ्रमणावर केन्द्रीत केल्याचा हा परिणाम म्हणायचा? पण हे ट्रम्प महोदय अत्यंत वाचाळ आणि बेभरवशाचे मानले जातात. संपूर्ण जग नि:मुस्लीम करण्याची वल्गना करणारे हेच ते सद्गृहस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी प्रशंसा केली म्हणून हुरळून जावे असे त्यात काहीही नाही. तोच प्रकार खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा. विशेषत: देशात कुठेही आणि कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की खासगी सर्वेक्षणांचे पेव फुटत असते. त्यांच्या निष्कर्षांचे पितळही अधूनमधून उघडे पडत असते. पण अलीकडेच पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीविषयी केल्या गेलेल्या सर्वेक्षणांच्या निष्कर्षांचे तेथील मतदारांनी अक्षरश: धिंडवडेच काढले होते. त्यातून मोदी सरकारच्या कारभारासंबंधी सव्वाशे कोटी जनता आणि साधारणपणे साठ कोटी मतदारांच्या वतीने काही हजारातील लोकानी व्यक्त केलेला अभिप्राय प्रातिनिधिक कसा काय समजला जाऊ शकतो? तरीदेखील मियाँ गालिब यांचे शब्द उधारीत घेऊन ‘दिल के बहलाने के लिये खयाल अच्छा है’ असे म्हणता येऊ शकेल.