शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - ही वाट दूर जाते

By admin | Updated: January 11, 2017 00:23 IST

चरैवेति-चरैवेति-चरैवेति। असा दिव्य संदेश मंत्रदृष्ट्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी दिला़ जन्मास आलेल्या प्रत्येकास

चरैवेति-चरैवेति-चरैवेति। असा दिव्य संदेश मंत्रदृष्ट्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी दिला़ जन्मास आलेल्या प्रत्येकास चालणे अनिवार्य ठरले. पायाने पांगळे असणारे सुद्धा कधी काठीचा तर कधी कुबडीचा आधार घेत चालू लागले़ चालणाऱ्यांच्या पायांना फुटतात नव्या वाटा़ कोणी कोणत्या वाटेवरून चालावे हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य़ काही जवळच्या वाटा पसंत करतात तर काही दूरस्थ वाटा़ काही म्हणतात, जीवनाची वाट अजून गवसली नाही़ वाटेवरून चालताना काहींचे जीवन यशस्वी झाले ते वाटेवरचे आनंदयात्री ठरले़ काहीना फ ारच जड गेले़ वाटेवरून चालताना सारेच खडतर ठरले़ ‘अजुनी चालतोचि वाट’ संपता संपेना़ त्यांच्या आयुष्यात वाटा खडतर ठरल्या़ स्वप्नामधील गावांना ते पोहचलेच नाहीत, यात वाटांचा काय दोष, वाटचाल तर आपण करीत असतो़ वाटेला सगळेच सारखे. ती भेदाभेद करीत नाही़ वाटेवर चालणे अवघड होते तेव्हा मात्र कोणाला तरी शरण जावे लागते़ वाट चुकण्यापेक्षा मार्गदर्शक असलेला बरा़ हिताच्या वाटा दाखविणारे म्हणजे संत़ आयुष्याला दिशा दाखविणारी वाट तेच दाखवू शकतात़ ती वाट असते प्रेमाची- भक्तीची- श्रद्धेची़ समाधानाची आणि सुखाची सुद्धा़ त्याला पंढरीची वाट असेही म्हणतात़ याच वाटेवर सावळे परब्रह्म भेटते़ या वाटेवर चालणाऱ्या वृद्धाशी बोलण्याचा योग आला़बाबा! तुमी कुण्या गावचे? बाबा म्हणाले- मुक्ताईच्या गावचे़ या वयात एवढ्या लांबून तेही चालत कशासाठी आलात? विठोबा तर सर्वत्र आहे़ सर्वव्यापी आहे़ मग हे चालत येण्याचे कष्ट कशासाठी? कोणी दाखविली ही वाट?म्हाताऱ्याबुवाचे डोळे पाणावले़ मुक्ताईने मला ही वाट दाखविली़ १४०० वर्षे वयाच्या चांगदेवाची आई आमची मुक्ताई़ एवढे कर्तृत्व जगाच्या पाठीवर फक्त मुक्ताईचेच आहे़ योगीराज चांगदेव पंधरा वर्षांच्या कुमारीकेच्या चरणावर डोके टेकवून शरण गेला़ ती मुक्ताई एकदा स्वप्नात आली म्हणाली- पंढरीच्या वाटेवर चाल. येतो गेली २५ वर्षे चालत़ मी तुमच्यासारखा शिकला सवरलेला नाही पण जीवाला लई सुख भेटतं़ माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला़ या अडाण्याला सुख गवसलं होतं़ सुखाची वाट सापडली होती़ ‘लई सुख भेटतं’ संत साहित्याचे सगळे सार तीन शब्दात सांगून तो मोकळा झाला होता़ माझा मित्र शेजारीच उभा होता़ तो म्हणाला सुख म्हणजे काय? त्याची प्रथम व्याख्या केली पाहिजे़ त्या बुद्धिवादी मित्राची पाठ थोपटून म्हणालो- चल चहा घेऊ या़ गरमागरम चहाचे घुटके घशाखाली घालताना तो म्हणत होता’ सुख वाटे जीवा़दोघांनाही सुख गवसलं होतं़ एवढे मात्र खरे की म्हाताऱ्याच्या सुखात आणि माझ्या बुद्धिवादी मित्राच्या सुखकल्पनेत जमीन अस्मानाचं अंतर होतं़ डॉ. गोविंद काळे