शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 08:05 IST

बड्या कंपन्या भारतात येतात आणि इथे पुंजी जमवून स्वदेशी पाठवतात. भारत गेली १६ वर्षे या फसवणुकीचा सामना करत आहे. हे कधी थांबेल?

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार 

अलीकडेच दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांचे विमान पालम तळावर उतरण्यापूर्वी एक दिवस आधी परराष्ट्र मंत्रालयाने ‘साऊथ ब्लॉक’मध्ये या भेटीची माहिती देणारी पत्रकार परिषद घेतली. पूर्व विभागाचे सचिव पी. कुमारन म्हणाले, ‘द्विपक्षीय व्यापार सत्तावीस अब्ज डॉलर्स होतो हे खरे असले तरी, त्यात बराचसा असमतोल आहे. आपण ६.५ अब्ज डॉलर्सच्या घरात निर्यात करतो, तर कोरिया २१.४ अब्ज डॉलर्सची. म्हणून व्यापक आर्थिक सहकार्य करारात समतोल आणण्याची गरज आहे.’ 

गेली १६ वर्षे या विषमतेबद्दल राजनैतिक स्तरावर कोणीच बोलले नाही, आणि आता सरकारनेच विषय काढला आहे. भारत दक्षिण कोरियाला करत असलेली निर्यात २०२४-२५  मध्ये ५.८२ अब्ज डॉलर्स इतकी घसरली. २१-२२ साली  ही निर्यात आठ अब्ज डॉलर्स होती. कोरिया भारताला करत असलेल्या निर्यातीचा आकडा मात्र याच कालखंडात २१.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. २०१० साली उभयपक्षी करार अस्तित्वात आला.  पंधरा वर्षे उलटल्यावर आयात-निर्यातीत तिप्पट तूट असल्याचे दिसत आहे. 

भारतातील कोरियन ब्लूचिप उपकंपन्या रोख कमाईची क्षमता आणि मूल्यांकनाच्या बाबतीत सरस आहेत.  एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाला २४ हजार ३६६ कोटी रुपयांचा महसूल गतवर्षी मिळाला. त्यात २२०३ कोटी रुपये नक्त नफा होता. वर्षाला तो ४६ टक्क्यांनी वाढत आहे. साऊथ कोरियातील मूळ कंपनीला  ४५४.६१ कोटी इतकी स्वामित्व धनाची रक्कम दिली गेली. ऑक्टोबर २०२५ मध्ये भारतातील उपकंपनीने जेव्हा आयपीओ आणला, तेव्हा समभाग नोंदणीच्या वेळी तिचे बाजार भांडवल १३ अब्ज रुपयांपर्यंत गेले. दक्षिण कोरियातील मूळ कंपनीचे भाग भांडवल सेउल भांडवल बाजारात त्यादिवशी नऊ अब्ज डॉलर्स इतके होते. मूल्य वसुलीच्या बाबतीत सॅमसंग इंडियाही मागे नाही.

मारुती-सुझुकीच्या बाबतीतही असेच घडले आहे. भारतातील सर्वात  मोठ्या वाहन निर्मात्यांनी अलीकडेच ५७ अब्ज डॉलर्स इतके मूल्यांकन जाहीर केले आहे. मूळ जपानी कंपनी सुझुकी मोटार कार्पोरेशनच्या भाग भांडवलापेक्षा ते जास्त आहे. हे योगायोगाने घडत नाही. पद्धतशीरपणे घडते आहे. ह्युंदाई  मोटार्स इंडिया आणि तिचे अपत्य किया यांची कहाणीही गुंतवणुकीच्या नावाखाली वसुली केली जात असल्याचे सांगते. अशा व्यवहारांमधून कोट्यवधी रुपये सेउलकडे जात आहेत. एकत्रितपणे या मोटार कंपन्या भारतातील  प्रवासी वाहन बाजारपेठेच्या २० टक्के हिश्श्यावर हुकूमत गाजवतात. 

कोरियन, जपानी यांच्यासारख्या मोठ्या विदेशी कंपन्या करात सवलत मिळवतील, तंत्रज्ञान हस्तांतरणात गफलती करतील, त्यांच्यासाठी धोरण लवचीक असेल; देशी कंपन्या मात्र त्यांच्याशी स्पर्धा करताना रक्तबंबाळ होतील. थेट विदेशी गुंतवणुकीला पायघड्या घालताना भारतीय धोरणकर्ते प्रभावाखाली येतात. त्यावेळी स्थानिक गुंतवणूकदारांना मात्र समान परतावा न मिळण्याचा धोका पत्करावा लागतो.  

व्हिएतनामचे उदाहरण तर आणखीनच वेगळे आहे. कोरियाची भारतातील एकूण थेट विदेशी गुंतवणूक २०२४ पर्यंत १० अब्ज डॉलर्स इतकी होती. व्हिएतनामी अर्थव्यवस्थेपेक्षा भारत १०  पटीने मोठा आहे. भारतीय ग्राहकांकडून मिळवलेला नफा, स्वामित्व धन तसेच आयपीओतून जमलेली रक्कम आणि लाभांश व्हिएतनाममधील कारखान्यांना अनुदानाच्या रूपाने पुरवून तेथील उत्पादने पुन्हा भारतात आणली जात आहेत. असे का? स्वदेशी नेते उच्चरवाने हा प्रश्न विचारत आहेत. कोरियन कंपन्या भारतातून कमावलेला पैसा छोट्या देशांतील कारखान्यांना पुरवतात. त्यातून भारतीय कंपन्या मारल्या जातात, हे भयंकर आहे. भारत ही जणू दुभती गाय आहे! 

हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात आहे. थेट गुंतवणुकीमुळे देशी उद्योगांना फायदा होईल, तंत्रज्ञान मिळेल आणि समतोल वाढ होईल असे वर्षानुवर्षे सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र हे धोरण विदेशी मोठ्या कंपन्यांचे उखळ पांढरे करणारे ठरले. नफा, स्वामित्व धन, विशेष लाभांश आणि आयपीओतून आलेली रक्कम उदारपणे त्या कंपन्यांकडे गेली. भारतीय कंपन्या मात्र मंजुरीला लागणारा विलंब, विविध गोष्टींची पूर्तता करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष यामुळे जेरीस येतात. स्वामित्व धनाच्या ओझ्यामुळे त्यांना नवे काही करता येत नाही. 

हे चित्र  बदलायला लागणारे धैर्य दिल्ली दाखवेल काय? की कोरियन किंवा जपानी वर्चस्वातून पुन्हा एकदा भारतातील संपत्ती तिकडे नेणे चालूच राहील?  या प्रश्नाचे उत्तर भारत आणि कोरिया यांच्यातील व्यापारी संबंधांची दिशा ठरविणारे असेल. भारत जगातली सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ, त्याचप्रमाणे जगातील वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था आहे. भारताच्या बाजूने जे वाटाघाटी करतील त्यांच्यात देशाबाहेर जाणारा पैसा अडवीण्याची संस्थात्मक इच्छाशक्ती असायला हवी. एरवी भारत पुन्हा एकदा अशा एखाद्या करारावर सही करणार, भोजनावळी घालणार आणि पुढच्याच विमानाने सेउलला नफा कसा जातो हे आपण पाहत बसणार! काय घडते ते येणारा काळ सांगेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Need courage to stop money flowing abroad; hurts self-reliance!

Web Summary : India faces trade imbalances with countries like South Korea, benefiting foreign companies. Profits flow out through royalties and IPOs while domestic firms struggle. Policy changes are needed to protect Indian interests and promote self-reliance; otherwise, India will keep losing money.