शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

भुतामुखी ब्रह्मज्ञान

By admin | Updated: October 14, 2015 22:22 IST

भारतात आणि खरे तर मुंबई शहरात गेल्या आठवडाभरात ज्या दोन अप्रिय घटना घडल्या, त्यांच्यामुळे पाकिस्तान सरकारचे ‘कनवाळू’ मन फारच व्यथित झालेले दिसते.

भारतात आणि खरे तर मुंबई शहरात गेल्या आठवडाभरात ज्या दोन अप्रिय घटना घडल्या, त्यांच्यामुळे पाकिस्तान सरकारचे ‘कनवाळू’ मन फारच व्यथित झालेले दिसते. आधी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणे संबंधित आयोजकांना भाग पडले आणि नंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमुद कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याआधी सदर सोहळ्याचे मुंबईतील यजमान सुधीन्द्र कुळकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले गेले. प्रकाशन समारंभ मात्र पोलिसांच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडला. पण दोन्ही कार्यक्रमांना जे गालबोट लागले त्याबद्दल पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने तीव्र चिंता व्यक्त करुन असा प्रकार पुन्हा होऊ नये अशी आशाही व्यक्त केली आहे. एकप्रकारे पाकिस्तानने भारताला सद्वर्तनाची, सहिष्णुतेची आणि संयमाची शिकवण देण्याचाच प्रयत्न केला आहे. जो देश आणि ज्या देशाचे सरकार प्रत्येक भारतीय वस्तुला पाकिस्तानात निषिद्ध मानते, त्या देशाने असे काही म्हणण्याचे धाडस करणे यालाच भुतामुखी ब्रह्मज्ञान म्हणायचे. अर्थात भारतीय परराष्ट्र विभागाने आपल्या शेजाऱ्याच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्याला प्रत्युत्तर देताना, सीमेपलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी आणि सीमेवर होणाऱ्या अतिरेकी कारवाया हाच भारताच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असून जोवर पाकिस्तान त्याला आळा घालीत नाही तोवर उभय देशांदरम्यान शांततेची चर्चा सुरुही होऊ शकत नाही असे म्हटले आहे. पण यात हेदेखील तितकेच खरे की मुंबईत झालेल्या प्रकारांवरुन पाकिस्तानला नाक वर करुन बोलण्याची संधी शिवसेनेने म्हणजे भारतानेच दिली आहे. सेनेने आजवर अनेक पाकी कलाकारांना विरोध केला असला तरी ज्या कलाकारांनी वा त्यांच्या येथील प्रायोजकांनी मातोश्रीपुढे गुळ-खोबरे ठेऊन उदबत्त्या पेटवल्या त्यांचे कार्यक्रम निर्वेध पार पडले आहेत. यात सिनेमे आहेत मालिका आहेत आणि बिग बॉससारखे रिअ‍ॅलिटी शोदेखील आहेत. अखेर राष्ट्रभक्तीदेखील ज्याच्या त्याच्या घराच्या उंबऱ्यापासूनच सुरु होत असते!