शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 08:15 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मते-मतांतरे खूपच असली, तरी भाजप सर्वात मोठा पक्ष असेल, यावर एकमत दिसते.. तर, ‘किती’ मिळतील?

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

अठराव्या लोकसभेत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा एक पक्ष म्हणून समोर येईल, असे आता विरोधी पक्षांनी जवळपास मान्य करून टाकलेले दिसते. संसदीय निवडणुकांच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चाललेल्या आणि तणावपूर्ण अशा निवडणुका शेवटच्या चरणात आहेत. ४ जून रोजी निकाल लागेल तेव्हा सत्तारूढ पक्षाला किती जागा मिळतील याची चर्चा आता जोरात आहे.

इंडिया आघाडीच्या बाजूने असलेल्या तज्ज्ञांना वाटते की, भाजपला २२०च्या घरात आणता येईल, जेणेकरून एनडीएला नरेंद्र मोदी यांच्या जागी दुसरा नेता निवडावा लागेल. मात्र भाजपला घसघशीत बहुमत आणि ३५० पर्यंत जागा मिळतील, असे सांगणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. सत्य या दोहोंच्या मधे कुठेतरी असेल, मात्र ते भाजपच्या बाजूने झुकेल. त्याची अनेक कारणे टीव्हीवर अहोरात्र चाललेल्या चर्चांमधून पुढे आली आहेत. २५० ते २६० जागांच्या मध्ये कुठे तरी भाजप थांबेल याची खात्री  अनेक तज्ज्ञांना वाटते आहे. जास्तीत जास्त जागा ३०० मिळतील आणि मोदी हेच पंतप्रधान राहतील; मात्र निसटत्या बहुमतावर!

संख्येच्या या खेळाबरोबर भाजपचे उमेदवार या निवडणुकीत किती फरकाने निवडून येतात याकडेही लक्ष असणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांत अनेक मतदारसंघातून भाजप उमेदवार ५-५ लाख मतांच्या फरकाने निवडून आलेले आहेत. २०१९च्या निवडणुकीत सुमारे २०० मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना १ लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. या मताधिक्यात लक्षणीय घट झाली तर मोदी विरोधी छावणीत जल्लोष होईल; कारण मोदींची ताकद कमी झाल्याचे ते द्योतक मानले जाईल. भाजपने जर मताधिक्य राखले तर मोदी यांची तिसरी कारकीर्द जास्त कडक असेल.

मोदी लागले कामाला

४ जून उजाडण्याच्या आधीच कामाला लागण्याची घाई मोदींना झालेली दिसते. नव्या मंत्रिमंडळाच्या यादीवर ते शेवटचा हात फिरवत आहेत. १० जूनच्या सुमारास शपथविधी ठेवण्याचा त्यांचा मानस असून, मग सर्वांना कामांची सुस्पष्ट रूपरेखा सांगितली जाईल. नव्या सरकारच्या पहिल्या १०० दिवसात कोणती कामे करावयाची याची योजना तयार करायला आपण आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे, असे मोदी यांनी विविध मुलाखतीत बोलूनही दाखवले आहे. सचिवांचेही त्यांनी दहा गट तयार केले असून, पहिल्या १०० दिवसात कोणकोणत्या निर्णयांची अंमलबजावणी करायची ते हे गट ठरवतील. कृषी, वित्त, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि इतर खात्यांच्या सचिवांचा या गटात समावेश आहे. देशात आणि परदेशात सरकारकडून कोणती कामे करावयाची आहेत याविषयीची माहिती मंत्री आणि सचिवांकडून पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे जमा केली जात आहे. दीर्घ काल रेंगाळलेल्या चार श्रमसंहिता सुरुवातीलाच मार्गी लावण्याचा मोदी यांचा विचार आहे. यासंबंधीची अधिसूचना निघाल्यावर वेतनाशी संबंधित बाबींवर कामगारांना मदत होऊ शकेल; पण त्याचबरोबर ‘कामावर घ्या - काढून टाका’ (हायर ॲण्ड फायर) अशा प्रकारची नवी राजवटही सुरू होईल.

लोकसभेच्या खासदारांची संख्या ७०० पर्यंत नेणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना योजनेलाही गती दिली जाण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी डेमोग्राफिक कमिशन स्थापन करण्याची मोदींची योजना आहे. ७० वर्षांवरील नागरिकांसाठी सात लाखांचा आरोग्य विमा आधीच जाहीर करण्यात आलेला आहे. ‘एक देश एक निवडणूक’ ही मोदींची आवडती योजनाही नव्या संसदेपुढे आणली जाईल, अशी शक्यता दिसते.

निज्जर प्रकरण : अमेरिका जुळते घेणार

भारतात मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर निज्जर प्रकरणात अमेरिका आणि कॅनडा नरमाईची भूमिका घेतील असे दिसते. अमेरिका आणि युरोप खंडातील बहुतेक देश उद्योगधंदे, अर्थकारणाला महत्त्व देतात. अमेरिकन राजकीय शास्त्रज्ञ आणि ‘ग्लोबल पोलिटिकल रिस्क कन्सल्टंट’ इयान ब्रेमर यांनी निवडणुकीच्या शेवटी शेवटी मोदी यांच्या बाजूने कल दर्शविला तेव्हा जागतिक पटलावर या बदलाच्या खुणा दिसू लागल्या. भारताचे चीनशी बरे नसले तरी दक्षिणेकडचे देश आणि पश्चिमी जगाशी भारत जवळीक ठेवू इच्छितो. त्यामुळे हे देशही भारताच्या जवळ येऊ पाहतात असे ब्रेमर म्हणाले होते. 

अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्याही निवडणूक प्रक्रिया संपण्याची वाट पाहताहेत. सत्तेवर आल्यास १५-१६ जूनला मोदी बहुधा पहिल्या विदेश दौऱ्यावर इटलीला जातील. तेथे ‘जी सेव्हन’ शिखर बैठकीतील नेत्यांना ते भेटतील. इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारताला शिखर बैठकीचे आमंत्रण दिले आहे. येणाऱ्या महिन्यात अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा होत आहेत. युक्रेन शांतता परिषद होत आहे. त्या परिषदेलाही पंतप्रधान किंवा परराष्ट्र व्यवहारमंत्री उपस्थित राहतील. स्विटझर्लंडमधील ल्युसर्न येथे होणाऱ्या या बैठकीला जी सेव्हन गटातील नेते इटलीहून जातील. १०-११ जूनला निज्नी नाव्हगोरोड येथे ब्रिक्समधील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार असून, परराष्ट्र व्यवहारमंत्री या बैठकीला जाण्याची शक्यता आहे. निकाल लागल्यानंतरच या सर्व आमंत्रणांच्या बाबतीत औपचारिक स्वरूपाचा प्रतिसाद दिला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी