शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

नव्या लढाईस तोंड

By admin | Updated: December 22, 2015 23:37 IST

दीर्घ कालावधीपासून अधांतरी लटकलेल्या, भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या, रसद साहाय्य करारावर (लॉजिस्टिक्स सपोर्ट अ‍ॅग्रिमेंट) अर्थात एलएसएवर वाटाघाटी सुरू करण्यास भारत

दीर्घ कालावधीपासून अधांतरी लटकलेल्या, भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या, रसद साहाय्य करारावर (लॉजिस्टिक्स सपोर्ट अ‍ॅग्रिमेंट) अर्थात एलएसएवर वाटाघाटी सुरू करण्यास भारत सरकारने मान्यता दिल्याने, पुन्हा एकदा देशाच्या सार्वभौमत्वाशी समझोता केल्याच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास प्रारंभ होण्याची चिन्हे दिसत आहे. भारताने स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच तटस्थतेचे धोरण स्वीकारले आणि अमेरिका व तत्कालीन सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखालील अनुक्रमे ‘नाटो’ व ‘वॉर्सा’ या दोनपैकी कोणत्याही लष्करी आघाडीत सामील होण्यास सदैव नकार दिला. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर सोव्हिएट रशिया कोसळला आणि जगाची रचना द्विध्रुवीयऐवजी एकध्रुवीय झाली. साहजिकच अनेक जागतिक समीकरणे बदलली. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संबंधांचाही त्यामध्ये समावेश होता. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर आणि विशेषत: दहशतवादाच्या भस्मासुराने जगभर हातपाय पसरल्यानंतर, भारत व अमेरिकेदरम्यान जवळीक वाढत गेली; परंतु तरीही उभय देशांदरम्यानच्या संबंधांनी थेट लष्करी सहकार्याची पातळी कधीच गाठली नाही. त्यामागे अर्थातच, रशिया काय म्हणेल, ही भारताला वाटणारी आणि पाकिस्तान काय म्हणेल, ही अमेरिकेला वाटणारी भीड हेच कारण होते; पण दरम्यान यमुना व पोटोमॅकवरील पुलांखालून बरेच पाणी वाहून गेले. मोदी सरकारने बदललेल्या परिस्थितीत, एलएसएसंदर्भातील वाटाघाटींना हिरवे निशाण दाखवून एक पाऊल पुढे टाकले आहे. एलएसएवर मोहर उमटल्यास, उभय देशांना एकमेकांच्या निवडक लष्करी व नौदल तळांचा वापर करता येईल आणि गरजेनुसार एकमेकांच्या विमाने व जहाजांना इंधन, तसेच इतर रसद पुरवठा करता येईल. त्सुनामीसारख्या भयंकर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी या कराराचा भारताला लाभ होईल. त्याचबरोबर चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांना आणि जागतिक दहशतवादाला आळा घालण्यासाठीही, भारत व अमेरिका या दोन्ही देशांना या कराराची आवश्यकता आहे. डावे पक्ष या कराराच्या विरोधात रान उठवणार, हे निश्चित आहे. राजकीय अपरिहार्यतेपोटी कॉंग्रेसही डाव्या पक्षांना साथ देण्याची दाट शक्यता आहे; मात्र या संभाव्य कराराची बीजं, २००६ मध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकार सत्तेवर असताना,अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या झालेल्या व्यूहात्मक भागिदारी दस्तीेवेजातच आहेत. भारत व अमेरिका लवकरच एलएसएवर स्वाक्षऱ्या करतील, असे त्यातच म्हटले होते. पुढे डाव्या पक्षांच्या दबावाखाली कॉंग्रेसने एलएसएला नकार दिला होता; पण एलएसएची गरज कॉंग्रेसच्या धुरीणांना ठाऊक आहे. आता परस्पर पाहुण्याच्या काठीने साप मारला जात असेल, तर कॉंग्रेसने डोळेझाक करायला हरकत नसावी; मात्र सध्याच्या अत्यंत कडवट राजकारणाच्या काळात तशी अपेक्षा करता येईल?