शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:27 IST

प्रश्न फक्त एवढाच नाही, की शेतकरी किडनी का विकतो किंवा गांजा का पिकवतो? खरा प्रश्न असा आहे की, तो या टोकापर्यंत कसा आणि का पोहोचतो? 

राजेश शेगोकार, वृत्तसंपादक लोकमत, नागपूर -

मातीशी नाते असलेला महाराष्ट्रातील शेतकरी कधीही गुन्हेगारीचा भाग नव्हता. पण आज जगण्यासाठीचा संघर्ष शेतकऱ्याला जगण्याच्याच विरोधात उभा करतो आहे. कर्जाचा फास आवळत जातो, पर्याय संपत जातात आणि शेवटी शेतकरी पैसा देणारा मार्ग निवडतो, आणि त्यापायी प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि भविष्य गमावून बसतो. ही केवळ व्यक्तीची नाही; व्यवस्थेची घसरण आहे.  महाराष्ट्रात कर्जबाजारीपणाचे संकट केवळ आर्थिक मर्यादेत राहिलेले नाही. ते आता शेतकऱ्याच्या निर्णयक्षमतेवर, नैतिकतेवर आणि कायदेशीर वर्तनावर परिणाम करू लागले आहे. 

एकीकडे सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकलेला शेतकरी अवघ्या लाख-दोन लाख रुपयांसाठी आपले आयुष्य, जमीन, साधनसामग्री गमावत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारांनी केलेल्या अमानुष वसुलीच्या एका प्रकरणात शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी किडनी विकावी लागली. हा संदर्भ अपवाद वाटू शकतो, पण तो वास्तवाचा आरसा आहे. कारण, अशी उदाहरणे पुढे येत नसली तरी दबाव, धमक्या आणि अवाजवी व्याजामुळे अनेक शेतकरी रोज मानसिकदृष्ट्या कोसळत आहेत. यातूनच काही शेतकरी टोकाच्या निर्णयांकडे वळताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर गांजाच्या शेतीकडे वाढलेला कल अधिक गंभीर ठरतो. बुलढाणा, यवतमाळ, नाशिक, धुळे, सांगली तसेच मराठवाड्यात गांजाची लागवड वाढत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. चंद्रपूरसारख्या सीमावर्ती भागांत तर हा उद्योग सुनियोजित पद्धतीने वाढवला जात आहे. गरीब शेतकऱ्यांची शेती बटाईने घेऊन आंध्र प्रदेशातील व्यापारी गांजाचे उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्याला तात्पुरता पैसा मिळतो, पण कायदेशीर गुन्ह्याची जबाबदारी त्याच्यावर येते; जमिनीचे दीर्घकालीन नुकसान होते आणि शेतीची ओळखच बदनाम होते.

इथे खरा धोका असा की, शेती आणि शेतकरी या संकल्पनांशी गुन्हेगारी जोडली जाऊ लागली आहे. ‘शेतकरी गांजा पिकवतो’ ही ओळ समाजमनात रुजली, तर त्याचा फटका प्रामाणिक, कष्टकरी शेतकऱ्यांनाच बसेल. पोलिस कारवाई, संशय, सामाजिक बदनामी आणि पिढ्यान्पिढ्यांचा कलंक हा सगळा भार शेवटी शेतकऱ्याच्या खांद्यावरच येतो. या दृष्टचक्रात काहीच शेतकरी अडकलेले असले तरी ही संख्या वाढली तर माेठी सामाजिक समस्या निर्माण हाेऊ शकते.

शेतकरी हे असले मार्ग का निवडतात? कारण, प्रामाणिक शेतीतून त्याला सुरक्षित उत्पन्नाची खात्री नाही. पीक विमा वेळेवर मिळत नाही, हमीभाव कागदापुरता आहे, नैसर्गिक आपत्तीची भरपाई अपुरी आहे आणि बँक कर्जासाठी त्याला वर्षानुवर्षे उंबरठे झिजवावे लागतात. अशा वेळी सावकार तत्काळ पैसा देतो आणि गांजाची शेती तत्काळ नफा दाखवते, हीच या अपप्रवृत्तींची खरी पाळेमुळे आहेत. मात्र, हा मार्ग आत्मघातकी आहे. किडनी विकणे हा शारीरिक मृत्यूचा, तर गांजाची शेती ही सामाजिक आणि कायदेशीर मृत्यूचा मार्ग आहे. दोन्हींचे मूळ एकच ते म्हणजे व्यवस्थेची उदासीनता.

आज प्रश्न एवढाच नाही, की शेतकरी किडनी का विकतो किंवा गांजा का पिकवतो? खरा प्रश्न असा आहे, की शेतकरी इथेपर्यंत का पोहोचतो? जेव्हा कायद्याच्या चौकटीत राहून जगणे अशक्य होते, तेव्हा माणूस कायदा मोडतो ही शेतकऱ्याची वृत्ती नाही, ही व्यवस्थेची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना दोषी ठरवून प्रश्न सुटणार नाहीत. कारण, उद्या किडनी विकणारा किंवा गांजा पिकविणारा शेतकरी वाढला, तर तो केवळ गुन्हेगारीचा आकडा नसेल तो व्यवस्थेवरचा न मिटणारा डाग असेल. आणि तो डाग आपण पुसणार आहोत की त्याच्याकडे पाठ फिरवणार, हा निर्णय अजून बाकी आहे.

अवैध सावकारांवर कठोर कारवाई, सीमावर्ती भागात विशेष पथके, शेतकऱ्यांना तातडीचे संस्थात्मक कर्ज, नुकसानग्रस्तांना थेट आर्थिक मदत आणि शेतीला प्रत्यक्षात फायदेशीर बनवणारी धोरणे हे सगळे उपाय एकत्र राबवले नाहीत, तर किडनी विकणारा आणि गांजा पिकविणारा शेतकरी हेच महाराष्ट्राचे भवितव्य ठरेल. आणि ते कोणत्याही अर्थाने स्वीकारार्ह नाही.     rajesh.shegokar@lokmat.com 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers' Desperation: Debt, Kidneys, and Cannabis Cultivation in Maharashtra

Web Summary : Facing debt and systemic failures, some Maharashtra farmers resort to selling kidneys or cultivating cannabis for survival. Urgent institutional support, financial aid, and effective agricultural policies are crucial to prevent further desperation and criminality among farmers. The system's apathy is pushing farmers to extreme measures.
टॅग्स :Farmerशेतकरी