शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

नकोशा आठवणींची अस्वस्थ सहल घडवणारा ‘डार्क टुरिझम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 08:58 IST

Dark Tourism: पर्यटन क्षेत्रात सातत्याने नवनवीन ट्रेंड्स येत असतात. सहलीला जाऊन काहीही करायचं नाही, फक्त निवांत झोप काढायची यासाठी हल्ली लोक ‘स्लीप टुरिझम’ला जातात. आध्यात्मिक पर्यटन तर बरीच वर्षे रूढ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ‘डार्क टुरिझम’ हा नवा ट्रेंडही सेट झालेला दिसतो.

पर्यटन क्षेत्रात सातत्याने नवनवीन ट्रेंड्स येत असतात. सहलीला जाऊन काहीही करायचं नाही, फक्त निवांत झोप काढायची यासाठी हल्ली लोक ‘स्लीप टुरिझम’ला जातात. आध्यात्मिक पर्यटन तर बरीच वर्षे रूढ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ‘डार्क टुरिझम’ हा नवा ट्रेंडही सेट झालेला दिसतो. ‘डार्क टुरिझम’मध्ये युद्ध, मृत्यू, नरसंहार, दुःख अशा कारणांमुळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या स्थळांना भेटी दिल्या जातात. एरवी ही ठिकाणं मनोरंजनासाठी नसतात. पारंपरिक प्रकारचं पर्यटनस्थळ म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात नाही. मात्र, डार्क टुरिझम या संकल्पनेखाली या स्थळांना महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यालाच ‘ग्रीफ टुरिझम’ असंही म्हटलं जातं.

या प्रकारच्या प्रवास योजनांमध्ये युद्ध, नरसंहार, नैसर्गिक आपत्ती, औद्योगिक दुर्घटना, उजाड झालेली शहरं, तुरुंग, स्मारकं अशा स्थळांना भेटी दिल्या जातात. यातील काही ठिकाणं ही पर्यटन नकाशावर पूर्वीपासून अस्तित्वात असली तरी त्याला ‘डार्क टुरिझम’ असं संबोधण्याचा, तशा स्थळांचा समावेश असलेली अख्खी सहल करण्याचा ट्रेंड मात्र नवीन दिसतो. सोशल मीडिया, त्यावरील ब्लॉग, प्रवासाविषयीचे पॉडकास्ट अशा अनेक स्वरूपांतून पर्यटनाविषयीचे नवनवीन ट्रेंड्स रुजताना आणि ते रूढही होताना दिसतात. अशा ठिकाणांचं ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व नव्याने उलगडून त्याला डार्क टुरिझममध्ये रूपांतरित केलं जाताना दिसत आहे. हा ट्रेंड वाढण्यामागे प्रत्यक्ष (जिवंत) अनुभवाशी थेट जोडता येईल अशा प्रवासाची ओढ हे एक महत्त्वाचं कारण ठरत आहे. पर्यटनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव, शिक्षण घेण्याकडे लोकांचा वाढता कल हेही डार्क टुरिझमच्या मागे आहे.

जगभरात डार्क टुरिझमची अनेक महत्त्वाची स्थळं आहेत. पोलंडमधील ऑशविट्झ-बिर्केनाऊ अर्थात नाझींच्या अत्याचारांच्या क्रूर आठवणी जागवणाऱ्या होलोकॉस्ट छळछावण्या, जपानमधील हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क, अमेरिकेतील ९/११ स्मारक, पर्ल हार्बर आणि युक्रेनमधील चेर्नोबिल ही डार्क टुरिझमची काही प्रसिद्ध उदाहरणं आहेत. अमेरिकेतल्या अल्काट्राझसारखे जुने तुरुंग, युद्धभूमी, नरसंहाराची स्मारकं आणि इटलीतील पोम्पेईसारखी ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जतन करण्यात आलेली उजाड शहरं ही डार्क टुरिझम साइट्स म्हणून ज्ञात आहेत. भारतात अमृतसरमधील जालियनवाला बाग, पोर्ट ब्लेअरमधील सेल्युलर जेल, भोपाळ गॅस दुर्घटना घडली तो परिसर आणि विविध दु:खद घटनांशी जोडलेले ऐतिहासिक किल्ले आणि ‘हाँटेड’ जागा हे डार्क टुरिझम प्रकारात पाहिले जातात. स्वस्त झालेला विमान प्रवास, वाढलेली कनेक्टिव्हिटी, पर्यटन क्षेत्राचा झालेला विकास आणि इंटरनेटमुळे सोप्या झालेल्या गोष्टी यांमुळेही डार्क टुरिझमचं प्रस्थ वाढत आहे.

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आणि त्यातून माणसांनी गमावलेले जीव, सर्वस्व यांचं स्मरण म्हणून डार्क टुरिझमला जाण्याचा ट्रेंड सध्या वाढताना दिसतो. मात्र, तो केवळ ट्रेंड न राहता त्याकडे अधिक संवेदनशीलपणे, जबाबदारीने पाहिलं तर नैतिकतेचे प्रश्न उपस्थित होत नाहीत. इतिहासाशी आपली नाळ जोडून ठेवण्यासाठीही डार्क टुरिझम हा एक नवा मार्ग म्हणून चर्चिला जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Dark Tourism: An unsettling journey through unwanted memories.

Web Summary : Dark tourism, visiting sites of tragedy like war zones and memorials, is gaining popularity. Driven by a desire for direct experience and education, places like Hiroshima and Auschwitz are now tourist destinations, prompting ethical considerations and historical reflection.
टॅग्स :tourismपर्यटनInternationalआंतरराष्ट्रीय