शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

चिनी पडझडीचा संकेत

By admin | Updated: January 13, 2016 03:34 IST

जस्त, अ‍ॅल्युमिनियम, तांबे, कच्चे खनीज तेल यासारख्या औद्योगिक वापराच्या जिनसांचे घसरत असलेले बाजारभाव, गेल्या वर्षीच्या आॅगस्ट महिन्यापासून चीनने त्याच्या चलनाचे

जस्त, अ‍ॅल्युमिनियम, तांबे, कच्चे खनीज तेल यासारख्या औद्योगिक वापराच्या जिनसांचे घसरत असलेले बाजारभाव, गेल्या वर्षीच्या आॅगस्ट महिन्यापासून चीनने त्याच्या चलनाचे दोन टप्प्यात घडवून आणलेले अवमूल्यन आणि चालू महिन्यातील पहिल्याच आठवड्यात लागोपाठ दोन दिवस चिनी शेअर बाजारात घडून आलेली घसरण या सगळ्यात एक सूत्र समान आहे. १९७८-७९ सालापासून जबरदस्त वेगाने मुसं़डी मारत जगाच्या अर्थ-नकाशावरील एक बलदंड भिडू म्हणून उदयाला आलेल्या चिनी अर्थव्यवस्थेची झळाळी उतरणीला लागलेली आहे, हाच या साऱ्या घडामोडींचा इत्यर्थ. २००८ सालातील आॅक्टोबर महिन्यापासून आर्थिक अरिष्टाचा सामना करत असलेली जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या आणखी एका बिकट वळणावर येऊन ठेपते आहे, या खडतर वास्तवाची कडू गोळी जागतिक समुदायाला या सगळ्यापायी आता गिळावी लागणार आहे. एवढे सगळे रामायण घडूनही चिनी धोरणकर्ते चीनने आजवर अवलंबलेल्या आर्थिक विकासाच्या निर्यातप्रधान धोरणाचा मुळापासून फेरविचार करण्याच्या मन:स्थितीत नाहीत, हेच वास्तव चिनी चलनाचे परवा घडवून आणले गेलेले अवमूल्यन अधोरेखित करते. मोठ्या मिनतवारीने काबूत आणलेल्या वाघावर मांड ठोकलेल्या स्वारासारखीच चिनी अर्थव्यवस्थेची आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्थेची आजची कोंडी दिसते. पश्चिमी बाजारपेठांमधील बेरोजगारी आणि त्यापायी थंड गोळ्यागत निपचित पडलेली मागणी नजीकच्या भविष्यात कूस पालटण्याची चिन्हे अंधुक असली तरीही नियातप्रधान विकासावरील भर देशी बाजारपेठेच्या विकासाकडे वळवणे चीनला अवघड आहे. आणि, त्या मार्गाने जाण्याचा विचार चिनी धोरणकर्ते, यथावकाश व यदाकदाचित मन:पूर्वक करु लागले तरी, चिनी बाजारपेठेवर अवलंबून असलेले जगातील अन्य देशच चीनला तो पर्याय सुखासुखी अवलंबू देणार नाहीत, अशीच चिन्हे आज दिसत आहेत. कारण, चिनी अर्थव्यवस्थेची आजवरची घोडदौड भविष्यात तशीच सुरळीत चालू राहील, या आशेवरच जस्त, तांबे, अ‍ॅल्युमिनियम यासारख्या औद्योगिक उपयोगाच्या खनिजांनी समृद्ध असलेल्या देशांनी त्यांच्याजवळील खनीज साठ्यांच्या व्यापारी उपयोगासाठी भल्याभक्कम गुंतवणुकी करुन ठेवलेल्या आहेत. या खनिजजन्य जिनसांच्या उत्पादनक्षमतांमध्ये संबंधित देशांनी आजवर त्याद्वारे बख्खळ वाढ करुन ठेवलेली आहे. या वाढीव उत्पादनक्षमता वापरात आणल्या गेल्या नाहीत तर त्या त्या देशांचा विकासदर आणि रोजगारवाढ धोक्यात यावी, हे सरळ व स्वाभाविक आहे. त्यामुळेच, चीनकडून येणाऱ्या मागणीमध्ये लक्षणीय घट होऊनही खनिजजन्य चीजांच्या उत्पादनामध्ये कपात करण्यास आजमितीस संबंधित देश अजिबात तयार नाहीत. या जिनसांच्या बाजारभावात जागतिक स्तरावर सध्या जी घसरण अनुभवास येते तिच्यामागील कार्यकारणभाव हा असा आहे. मुळात, देशी बाजारपेठ विकसित करण्याकडे चिनी धोरणकर्त्यांनी गेल्या ३६ वर्षांत घाऊक दुर्लक्षच केल्यामुळे आर्थिक विकासाचे निर्यातोन्मुख धोरण आणखी काही काळ तरी तसेच रेटत राहण्याखेरीज चीनलाही आजघडीला पर्याय नाही. अमेरिकेसह युरोपीय समुदायातील देशांमधील बाजारपेठांमध्ये सशक्त मागणीच्या सळसळीचा आजपावेतो तरी कोठेही मागमूस नाही. खरेदीसाठी खिशात हात घालण्यास मुदलातच कमालीच्या निरुत्साही बनलेल्या पश्चिमी ग्राहकाना चुचकारायचे तर मालाचे भाव पाडण्याखेरीज उत्पादकांना व्यवहारात अन्य पर्याय नसतो. चिनी युआनचे अवमूल्यन घडवून आणण्याने युआन व अमेरिकी डॉलरच्या विनिमय दरात बदल घडून येऊन सर्वसाधारण अमेरिकी ग्राहकाच्या लेखी चिनी वस्तू स्वस्त होऊन निदान त्यामुळे तरी चिनी उत्पादनांना अमेरिकी बाजारपेठेत असलेल्या मागणीला पुनश्च एकवार धुगधुगी लाभेल, या आशेपायी गेल्या आॅगस्ट महिन्यापासून चिनी धोरणकर्त्यांनी युआनचे दोन टप्प्यात अवमूल्यन घडवून आणले. परंतु, त्यामुळे आणखी एका नवीनच संभाव्य धोक्याचे ढग अर्थकाशात गर्दी करु लागतात की काय, अशी धास्ती बळकट होते आहे. निर्यातप्रधान आर्थिक विकासाच्या ‘मॉडेल’ची कास आजवर मनोभावे धरलेल्या सगळ्याच अर्थव्यवस्थांनी चीनच्या पावलावर पाऊल टाकून आपापल्या देशी चलनांचे अवमूल्यन घडवून आणण्याचा धडाका लावला तर त्यातून निर्माण होणाऱ्या अनिष्ट स्पर्धेचा फटका सगळ्यांनाच बसेल. आणि नेमक्या याच भीतीपायी चिनी शेअर बाजार हडबडलेला आहे. एकूण काय तर, २१व्या शतकातील हे ‘सोळावंं वरीस’ जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने धोक्याचे ठरेल, याचेच हे संकेत ! या आव्हानांच्या पोटातच आपल्या दृष्टीने संधी दडलेल्या आहेत. त्यांचा लाभ उठविण्यासाठी आर्थिक प्रगल्भता व राजकीय सामंजस्याची मूठ मात्र बांधावी लागेल.