शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लेख: बिबट्यांवर चिडलेली माणसे आणि वनखात्यापुढला पेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:36 IST

गावागावांत, शहराच्या लोकवस्तीत शिरणारे बिबटे ‘वनतारा’त किंवा परराज्यात पाठवणे, बिबट्यांची नसबंदी करणे असे उपाय चर्चेत आहेत. पण, तेवढ्याने भागेल?

सुधीर लंके निवासी संपादक, लोकमत, अहिल्यानगरबिबट्यांनी आपल्यावर हल्ला करू नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गळ्यात टोकदार पट्टे घातले आहेत. असे पट्टे शेतकरी आजवर पाळीव प्राण्यांच्या गळ्यात घालत होते. महिलाही मंगळसूत्र घालावे तसे हे पट्टे घालून शेतात कामाला जात आहेत. माणूस आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष किती टोकदार झाला आहे याचे हे ज्वलंत उदाहरण. गत जुलै महिन्यात विधिमंडळात माहिती देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, राज्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतरही हे मृत्यू सुरूच आहेत. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात बिबट्याने अलीकडे तीन बळी घेतले. अहिल्यानगर जिल्ह्यातही हे घडले. नाशिकसारख्या शहरात बिबट्या घुसला. वनविभाग आता १० कोटी रुपये खर्चून १० हजार पिंजरे खरेदी करणार आहे. 

बिबटे पकडून ते ‘वनतारा’त किंवा परराज्यात पाठवू, असेही वनमंत्री म्हणाले. बिबट्यांची नसबंदी करण्याचाही प्रस्ताव आहे. पण, खरेच तेवढ्याने भागणार आहे का? बिबट्यांचे अभ्यासक स्वप्निल कुंभोजकर यांचे म्हणणे आहे की, ‘बिबट्या आपला अधिवास सहसा लवकर बदलत नाही. पुणे जिल्ह्यात जुन्नर परिसरात जी धरणे झाली त्यातून जंगलाची जागा पाण्याखाली गेली. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे सरकले. ही धरणे सत्तरच्या दशकात झाली. पण, बिबट्यांचे हल्ले साधारण सन २००० पासून दिसतात. याचा अर्थ विस्थापित झालेला बिबट्या जंगलातून माणसांकडे सरकण्यासाठी २५-३० वर्षांचा काळ लागला. आता त्याचा प्रवास पुन्हा जंगलाच्या दिशेने करायचा असेल तर तेही लवकर घडणार नाही. त्यासाठी दीर्घकालीन उपाय लागतील. पण, आत्ता तातडीने माणसांच्या सुरक्षेसाठी उपाय हवेत.’

वनमंत्र्यांनीही तात्पुरत्या व दीर्घकालीन उपायांबाबत भाष्य केले आहे. केनिया देशाने जंगली प्राण्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी ‘सोलर लायन लाईट’चा प्रकल्प राबविला. यात गावाच्या आसपास रात्री चमकणारे एलईडी फ्लॅश लाईट बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्राणी गावाजवळ येण्याचे प्रमाण कमी होते. उत्तराखंडमध्ये जंगलाभोवती ‘लेमनग्रास, अगेव्ह, रम्बंस’ या गवतांचे कुंपण (बायोफेंसिंग) करण्यात आले आहे. यातून काटेरी, दाट वनस्पतींचा पट्टा तयार होतो. आपणाकडेही साबरकांडे ही काटेरी वनस्पती वनविभाग जंगलाच्या सीमेवर लावत होता. त्यातून मार्ग काढणे बिबट्याला सोपे नाही. पण, माणसांनी हे कुंपण टिकू दिले पाहिजे. 

खेड्यातील लोकांना तातडीने चार्जेबल बॅटरी, काठ्या पुरविणे हे प्राथमिक उपाय आहेत, असे कुंभोजकरांसारखे तज्ज्ञ सांगतात. कारण बॅटरीच्या प्रकाशामुळे बिबट्या जवळ येत नाही. लोकांनी गळ्यात घातलेले काटेरी पट्टे हा दुर्दैवी उपाय आहे. पण, मानेवरील हल्ला हा सर्वांत जीवघेणा असतो. तो या पट्ट्यामुळे टळेल. शेतात काम करताना भ्रमणध्वनीवर किंवा ब्लू टूथच्या स्पिकरवर गाणे वाजविणे, मोठ्याने गप्पा मारणे हेही उपाय आहेत. कारण, आवाजाला बिबट्या घाबरतो.

घराजवळ उसाची शेती टाळणे हाही उपाय आहे. पण, शेतकरी ते करू शकत नाही. कारण त्याचे अर्थाजनच त्यावर आहे. दिवसाच वीज पुरवली तर शेतकऱ्यावर पिकाला पाणी देण्यासाठी रात्री बाहेर पडण्याची वेळच येणार नाही. अर्थात आता बिबट्या दिवसाही हल्ले करू लागला आहे. पण, तरीही काही प्रमाणात यास अटकाव बसेल. त्यामुळे आता वनखात्याने एकट्याने आपले घोडे दामटू नये. या विषयावर साध्या ग्रामसभा अद्यापपर्यंत बोलावलेल्या नाहीत. अनेक गावे दहशतीखाली आहेत. ग्रामसभा घेऊन लोकांकडे, अभ्यासकांकडे काय उपाय आहेत ते सरकारने ऐकले पाहिजे. जिल्हा प्रशासनही यात सतर्क हवे. सरकार दुर्लक्ष करीत राहिले तर लोकांचा क्षोभ वाढेल. वनखाते हाताची घडी घालून बसले तर बिबट्यांना थेट मारुनच टाका या चर्चेला जोर चढेल. कारण हाडामांसाची माणसे डोळ्यांदेखत मृत्युमुखी पडत आहेत. बिबट्या जगलाच पाहिजे. पण, अगोदर माणूस जगला पाहिजे हे सरकारला लक्षात घ्यावे लागेल. बिबट्या गावात आहे, सरकारने केवळ मंत्रालयातून धोरण ठरवून कसे चालेल?

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Attacks Spark Fear: Villagers, Forest Department Seek Solutions

Web Summary : Escalating leopard attacks instill fear, prompting villagers to take drastic measures for safety. Experts suggest immediate solutions like lighting and long-term strategies like bio-fencing. The Forest Department faces pressure to protect both humans and leopards, urging community involvement and proactive measures to prevent further conflict.
टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरleopardबिबट्या