सेंट्रींगचे काम करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:08 IST2019-12-20T12:07:32+5:302019-12-20T12:08:33+5:30

नूतन विद्यालयाने देखील तक्रार केली होती

Young man dies after lightning strikes | सेंट्रींगचे काम करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Dhule

न्याहळोद : येथील खणक्या प्लॉट भागात घर बांधकाम सुरू असतांना विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू झाला. याठिकाणी उच्चदाबाची विद्युत वाहिनी गेली असून ती धोकेदायक असल्याचे दिसून आले.
येथे दिलीप पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. आज दुपारी येथे सेंट्रींगचे काम सुरू असतांना कामगार रवींद्र रतीलाल अहिरे (वय २७, रा.धनूर) यास विजेचा धक्का बसला. त्यास रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
याठिकाणी उच्च दाबाची विद्युत तार कुंभार वाड्याकडून नूतन विद्यालायकडे गेली आहे. ज्या ग्रामस्थाचे बांधकाम सुरू आहे त्यांची याबाबत अनेक दिवसांपासून तक्रार आहे. नूतन विद्यालयाने देखील तक्रार केली होती. मात्र याचा मार्ग न बदलल्याने अपघात होत आहेत.

Web Title: Young man dies after lightning strikes

टॅग्स :Dhuleधुळे