पहिली पत्नी असताना दुसरीशी केले लग्न, २२ जणांवर गुन्हा

By Admin | Updated: April 14, 2017 00:29 IST2017-04-14T00:29:46+5:302017-04-14T00:29:46+5:30

नंदुरबार : पहिली पत्नी असताना दुसरीशी लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार येथील युवकासह तब्बल २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

While married, married couple married, 22 accused of marriage | पहिली पत्नी असताना दुसरीशी केले लग्न, २२ जणांवर गुन्हा

पहिली पत्नी असताना दुसरीशी केले लग्न, २२ जणांवर गुन्हा


नंदुरबार : पहिली पत्नी असताना दुसरीशी लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार येथील युवकासह तब्बल २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारातील कोकणीहिल परिसरात राहणाºया प्रशांत रोहिदास साळवे (२६) या युवकाचा आंबेडकर चौकातील मनीषा साळवे या युवतीशी जातीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. विवाहानंतर त्याने मनीषा यांना माहेरी हाकलून देत कोकणीहिल परिसरातील युवतीशी विवाह केला. त्यानंतर मनीषाला तो नांदवत नव्हता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यावर मनीषा साळवे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून प्रशांत रोहिदास साळवे, रोहिदास रामदास साळवे, निर्मला रोहिदास साळवे, सचिन रोहिदास साळवे, हर्षदा रोहिदास साळवे, सर्व रा.कोकणीहिल, मंजूबाई भाईदास धोतरे, आशाबाई हंसराज खैरनार, हंसराज भास्कर खैरनार, सर्व रा.वाका चाररस्ता, गौतम बाबूलाल पिंपळे, शैला गौतम पिंपळे, रा.पाटोंदा, प्रभाकर देवचंद पिंपळे, शोभा प्रभाकर पिंपळे, रा.धुळे, सोनल प्रभू शिंदे रा.कोकणीहिल, प्रभू विठ्ठल शिंदे, बानुबाई प्रभू शिंदे, गौतम प्रभू शिंदे, सिद्धार्थ प्रभू शिंदे, रा.कहाटूळ, वंदना मधुकर जावरे, सुभाष विठ्ठल शिंदे, भगवान विठ्ठल शिंदे, नाना विठ्ठल शिंदे व रेखा सुभाष शिंदे, रा.तळोदा यांच्याविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: While married, married couple married, 22 accused of marriage