शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

६ लाख ३५ हजारांचा ओला,सुका गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 10:58 PM

१६९ किलो : शिरपूर तालुक्यातील कारवाई

धुळे/शिरपूर : शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान आणि सड्यापाडा भागात गांजाची झाडे आणि सुका गांजा असल्याची माहिती मिळताच छापा टाकण्यात आला़ त्यात १६९़५ किलो वजनाचा ६ लाख ३५ हजार ५०० रुपये किंमतीचा ओला आणि सुका गांजा जप्त करण्यात आला़ दरम्यान, शेत मालक हा फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे़ शिरपूर तालुक्यातील सड्यापाडा, लाकड्या हनुमान या गावातील एका शेतात मानवी मेंदूवर परिणाम करणारे गांजाचे झाडे, सुका गांजा आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली़ त्यानुसार, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उमेश बोरसे,  उपनिरीक्षक हनुमान उगले, नरेंद्र खैरनार, दीपक वारे, हेड कॉन्स्टेबल रफिक पठाण, पोलीस कर्मचारी प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, कुणाल पानपाटील, गौतम सपकाळे, उमेश पवार, राहुल सानप, रविकिरण राठोड, विशाल पाटील, योगेश दाभाडे, केतन पाटील यांच्या पथकाने छापा टाकला़ सदरहू गावातील एका शेतात सफेद कपड्यावर सुका गांजा पडलेल्या स्थितीत दिसून आला़ समोरच असलेल्या जागेवर कापूस आणि तूरच्या शेतामध्ये झाडांच्या अडोश्याला गांजाचे झाड लावलेले होते़ हे शेत बिला रविंद्र पाडवी (रा़ लाकड्या हनुमान ता़ शिरपूर) याचे असल्याचे पोलीस तपासातून समोर आले़ शेतमालक फरार झाला आहे़ ११६़५० किलो वजनाचा ५ लाख ८२ हजार ५०० रुपये किंमतीचा सुका गांजा आणि ५३ किलो वजनाचा ५३ हजार रुपये किंमतीचा ओला गांजा असा एकूण १६९़५० किलो वजनाचा ६ लाख ३५ हजार ५०० रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे़ याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, गेल्या दोन दिवसांपुर्वीच याच तालुक्यातून पोलिसांनी गांजाची पिके जप्त केली होती़ लागोपाठ दुसरी कारवाई झालेली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी