शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीची रक्कम टंचाईच्या निधीतून द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:03 IST

जि.प. सर्वसाधारण सभा : पाईपलाइन टाकण्याच्या कामास आचारसंहितेचा अडसर

ठळक मुद्देसभेत फक्त आयत्यावेळच्या विषयांवर चर्चाआचारसंहितेचे कारण सांगून कामे होत नसल्याची नाराजीपाणी टंचाईवर झाली चर्चा

आॅनलाइन लोकमतधुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरानदीत आवर्तन सोडण्यात येते. मात्र हे आवर्तन सोडण्यासाठी सिंचन विभागातर्फे पाणीपट्टी रक्कमेची मागणी केली जात आहे. सध्या दुष्काळ असल्याने, पाण्याची समस्या लक्षात घेऊन, पाणीपट्टीची रक्कम टंचाईच्या निधीतून देण्यात यावी असा ठराव करण्यात आला.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा  यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती लिलावती शिक्षण सभापती नूतन पाटील, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे उपस्थित होते.सध्या लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्याने कुठल्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने, सर्वसाधारण सभेत फक्त आयत्यावेळच्या दोन विषयांवर चर्चा करण्यात आली.शिंदखेडा तालुक्यातील रामी येथे तीव्र पाण्याची टंचाई आहे. या गावासाठी तापीनदीवरून पाईपलाइन मंजूर झाली असून, त्याची वर्क आॅर्डरही निघालेली आहे. या परिसरात बागायती शेती असल्याने, त्यावेळी पाईपलाइन टाकता आली नाही. आता शेती मोकळी झालेली आहे. परंतु आता आचारसंहितेचे कारण पुढे करीत काम बंद ठेवलेले आहे. अधिकारी लाइनआऊटही करून देत नाही. याबाबत जि.प. सदस्य कामराज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. तर लेखी आदेश नसल्याने, तोपर्यंत काम थांबविता येणार नाही अशी सूचना अध्यक्ष दहिते यांनी केली.त्यानंतर अक्कलपाडा धरणातून सोडण्यात येणाºया आवर्तनाविषयी जि.प. सदस्य किरण पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. अक्कलपाडा धरणातून पांझरानदीत आवर्तन सोडले जाते. मात्र त्यासाठी पांझरा नदीकाठावरील गावांनी पाणीपट्टीची रक्कम भरावी असा आग्रह सिंचन विभागातर्फे धरण्यात येतो आहे. पांझरा किनारी असलेल्या ग्रामपंचायतींकडे सुमारे ५ कोटीची थकबाकी आहे. सध्या पाण्याची टंचाई लक्षात घेता पाणीपट्टीची रक्कम टंचाईच्या निधीतून भरण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला. 

टॅग्स :Dhuleधुळे