वाहनधारकांनी श्रमदान करुन बुजविले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:16 PM2020-02-24T12:16:24+5:302020-02-24T12:24:42+5:30

निजामपूर : खुडाणे रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष

Vehicle holders donated pockets | वाहनधारकांनी श्रमदान करुन बुजविले खड्डे

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : साक्री तालुक्यातील निजामपूर-खुडाणे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून प्रवाशी, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मात्र, या रस्ता दुरवस्थेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अखेर या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी स्वत:च हातात टोपली- पावडी घेत रस्त्यावर माती, मुरूम टाकून खड्डे बुजविणे सुरू केले आहे.
निजामपूर- खुडाणे या सुमारे ४.५ कि.मी. रस्त्यावर जैताणेपासून केवळ १ कि.मी. अंतरावर डांबरीकरण झाले आहे. त्यापुढील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच खड्डे चुकविण्याच्या नादात येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याची त्वरित दुरुस्त व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. अखेर खुडाणे येथील वाहन मालक- चालक युनियनने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. महेश महाले, कारभारी शेवाळे, सावता गवळे, चेतन गवळे, दिनेश खैरणार, हरी खैरणार, पिंटु सोनवणे, समाधान अहिरे, नितिन गवळे आदींनी श्रमदान केले.

Web Title: Vehicle holders donated pockets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे