शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
2
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
3
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
4
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
5
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
6
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
7
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
8
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
9
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
10
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
11
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
12
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
13
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
15
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
16
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
17
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
18
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
19
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील शासकीय ग्रंथालयात १० वर्षानंतर पुस्तकांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 11:51 IST

जिल्हा नियोजन समितीमार्फत २५ लाखांचा निधी मंजूर

अतुल जोशी।आॅनलाइन लोकमतधुळे : भाषा संवर्धनाचे सर्वात महत्वाची भूमिका ग्रंथालये बजावित असतात. परंतु ग्रंथालयांनाही निधीची चणचण भासत पुस्तकांची खरेदी करता येत नाहीत. निधीअभावी धुळे शासकीय ग्रंथालयात तब्बल दहा वर्षांपासून पुस्तकांची खरेदीच झाली नव्हती. मात्र आता पुस्तके खरेदीसाठी तब्बल २५ लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्यातून पाच ते दहा हजार पुस्तके, कादंबऱ्यांची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी दिली.ग्रंथ हे आपले गुरू आहेत. ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याचा जितका उपयोग आपण करू, तितके आपणच समृद्ध होत असतो. धुळ्यात जिल्हा शासकीय ग्रंथालय आहे. सुरवातीला या ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदीसाठी निधी मिळायचा. मात्र २००८-०९ पासून ग्रंथ खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीचा निधीच मिळाला नाही. परिणामी गेल्या १० वर्षात शासकीय ग्रंथालयासाठी पुस्तकांची खरेदीच झाली नाही. निधीअभावी ग्रंथालयात नवीन पुस्तके, कादंबºया आदींची भर पडू शकली नव्हती. ग्रंथसंपदेची संख्या ५४ हजारांवरच थांबलेली होती. दरम्यान शासकीय ग्रंथालयाला ग्रंथ खरेदीसाठी निधी मिळावा यासाठी अधिकाऱ्यांमार्फत सारखा प्रयत्न सुरू होता. त्याला आता यश मिळालेले आहे.ग्रंथखरेदीसाठी २५ लाख मंजूरजिल्हा नियोजन समितीकडून जानेवारी २०२० मध्ये पुस्तके खरेदीसाठी तब्बल २५ लाख रूपयांचा निधी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मंजूर केला आहे.सात-आठ हजार पुस्तकांचीखरेदी करणारमंजूर झालेल्या निधीमधून ग्रंथालयासाठी सात ते आठ हजार विविध पुस्तक, ग्रंथांची खरेदी केली जाणार आहे. यात कथा, कादंबºयासोबतच स्पर्धा परीक्षांची पुस्तके, शेतीवर आधारित पुस्तकांची खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे या ग्रंथालयाची ग्रंथसंपदा आता वाढणार असल्याचे सांगण्यात आले.शासकीय ग्रंथालय अंतर्गत जिल्ह्यात २२२ वाचनालये आहेत. यात ‘अ’वर्गाचे ३६ आहेत.

ग्रंथालयात २००८-०९ पासून ग्रंथ खरेदी झालेली नव्हती. तब्बल १० वर्षानंतर ग्रंथ खरेदीसाठी २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मंजूर झालेल्या निधीतून सात ते आठ हजार ग्रंथ, पुस्तकांची खरेदी लवकरच केली जाणार आहे. -संजय मस्के,जिल्हा ग्रंथालय अधिकारी

टॅग्स :Dhuleधुळे