यात्रा रद्द, आठवडे बाजार, मंदिरे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:04 PM2020-03-17T22:04:19+5:302020-03-17T22:04:48+5:30

खबरदारी : ग्रामीण बाजारपेठेत शुकशुकाट, व्यवहार ठप्प, ढंडाण्याची कपिलेश्वर यात्रा पोलिसांनी केली बंद

Travel canceled, week markets, temples closed | यात्रा रद्द, आठवडे बाजार, मंदिरे बंद

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/दोंडाईचा/तिसगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये यासाठी शहरासह ग्रामीण भागातील जनता उत्स्फूर्तपणे दक्षता बाळगत असून प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तंतोतंत पालन केले जात आहे़ मेळावे, यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांवर ३१ मार्च पर्यंत प्रशासनाने बंदी घातली आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील यात्रा तसेच आठवडे बाजार रद्द करण्यात आले आहेत़
कोरोनामुळे ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे़ ग्रामीण बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे़ व्यवहार ठप्प झाले आहेत़ त्यामुळे व्यावाऱ्यांचे नुकसान तर होतच आहे; पण अनेकांचा रोजगार बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़
विशेष म्हणजे नागरीकांकडून उत्स्फूर्तपणे कमालिची दक्षता घेतली जात असून ग्रामीण भागातही नागरीकांनी मास्क, रुमाल तोंडाला गुंडाळले आहेत तर हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरचाही वापर होताना दिसत आहे़
वरखेडे गावाची यात्रा रद्द
कोरोनामुळे वरखेडे गावातील बहीराम महाराज यांचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे़ दरवर्षी गुढीपाडव्याला ही यात्रा भरते़ परंतु यंदा प्रशासनाने बंदी घातल्यामुळे यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असून दुकाने लावणाºया व्यापारी, व्यावसायिकांनी येवू नये, असे आवाहन शिवसेनेचे उपतालुका प्रमुख देवराम माळी, ईश्वर मराठे, रवींद्र धनगर, रामदास माळी, रवींद्र पाटील, सुधाकर पाटील, भगवान मराठे, मनोहर जयराम मराठे, नरेंद्र चौधरी यांच्यासह गावकऱ्यांनी केले आहे़
पिंपळादेवीची यात्रा रद्द
सव्वाशे वर्षांची परंपरा
प्रशासनाच्या आदेशानुसार तिसगाव येथील ग्रामस्थांनी सवार्नुमते चर्चा करून पाडव्याच्या दुसºया दिवशी आई पिंपळादेवी देवी यात्रोत्सव व कुस्त्यांची दंगल रद्द करण्याचा निर्णय घेतला़ ब्रिटिश काळापासून सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत कधीही खंड पडला नाही़ त्यामुळे गावासह पंचक्रोशीत काही अंशी नाराजी आहे़ दरम्यान, ढंडाने येथील कपिलेश्वर महादेवाची यात्रा मंगळवारी रात्री पोलिसांनी बंद केली़
दरम्यान, तमाशा मंडळ, खेळणी, पाळणे, हॉटेल्स आणि इतर व्यवसायिकांसह मल्ल आणि कुस्ती प्रेमींनी यात्रोत्सवाला येवू नये असे आवाहन सरपंच ज्ञानजोती भदाणे, विनायक पाटील, दिनेश भामरे, पंकज भामरे, सचिन पाटील, संदीप शिरसाट यांनी केले आहे़
देवपूर पश्चिमचे पोलिस निरीक्षक कुबेर कचवे यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी जमाव बंदी करण्यात आली आहे़ त्यामुळे आम्ही स्थानिक पोलीस पाटील यांना कळवून गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत़
दोंडाईचा येथील गुरुवारचा आठवडे बाजार बंद
खबरदारीचा उपाय म्हणून दोंडाईचा शहरातील जिम, गुरूवारचा आठवडे बाजार, खाजगी शिकवण्या बंद ठेवण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
तसेच नगरपालिकेच्या प्राथमिक, अनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर केली आहे. तीन जिम बंद ठेवण्याची नोटीस दिली आहे़
कोरोनाबाबत जनजागृती व्हावी, जनतेने कशी काळजी घ्यावी याबाबत माहिती मिळावी म्हणून नगरपालिकेतर्फे माहिती पत्रक वाटणार आहे. कोरोना बाबत कोणीही अफवा पसरवू नये़
जनतेने घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ़ दीपक सावंत, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे यांनी केले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद करण्याचे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़
४कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी समाजस्वास्वास्थ्याचा विचार करुन शासनाच्या आदेशानुसार जनहितार्थ ३१ मार्च पर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी घेण्यात आला़ भाविकांनी दर्शनासाठी येवू नये, असे आवाहन बीएपीएस स्वामी नारायण मंदिर संस्थेतर्फे करण्यात आले आहे़ भाविकांनी शक्यतो बाहेर निघू नये असे आवाहन त्यांनी केले आहे़
धुळे येथील एकवीरा देवी व रेणुकामाता मंदिरात केवळ खान्देशातीलच नव्हे तर महाराष्ट्र आणि शेजाराच्या राज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात़ ठिकठिकाणाहून आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकवीरा देवी मंदिर बंद करण्याचे आदेश मंगळवारी प्रशासनाने दिले़ मंदिर ट्रस्टला प्रशासनाचे पत्र प्राप्त झाले असून ३१ मार्च पर्यंत मंदिर बंद करण्यात आल्याची माहिती एकवीरा देवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टने दिली़ परंतु धार्मिक विधी सुरूच राहतील असे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी स्पष्ट केले़

Web Title: Travel canceled, week markets, temples closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे