शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

सिमेवरील जवानाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 23:18 IST

वलवाडीसह महिंदळे शिवारात घरफोडी : रोकडसह दागिने लांबविले, पोलिसात गुन्हा दाखल

धुळे : धुळ्यातील वलवाडी आणि महिंदळे शिवारात चोरट्यांनी हातसफाई करीत सुमारे दोन लाखांचा ऐवज लांबविला आहे़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, वलवाडी शिवारात चोरट्यांनी हातसफाई केलेले घर सिमेवरील जवानाचे आहे़ वलवाडी शिवारातील अक्षय कॉलनीत राहणाºया निता नेमीचंद पाटील यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, रविवारी पहाटे सव्वा तीन ते ४ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला़ कपाटाचे लॉकर्स फोडून १ लाख रुपये किंमतीची ४ तोळे वजनाची सोन्याची पट्टीची माळ, ७ हजार रुपये किंमतीची चांदीची लक्ष्मीची मुर्ती आणि २५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ३२ हजाराचा ऐवज लंपास केला आहे़ याप्रकरणी सोमवारी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल झाला़ निता पाटील यांचे पती नेमीचंद पाटील हे सिमेवरील जवान आहेत़ महिंदळे शिवारात असलेल्या मिनाई कॉलनीत राहणाºया कविता अधिकार पाटील या महिलेने धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेनंतर ते १ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा      कडीकोंडा तोडून ४ हजार रुपये रोख आणि ७ हजाराचे दागिने असा एकूण ४७ हजाराचा ऐवज लंपास झाला आहे़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ पोलिसांनी तपास सुरु केला आहे़ केवळ  बंद घर ठरतेय लक्षस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणाºया टोळीला सुरत येथून अटक करण्यात आली़ यानंतर चोरी, घरफोडीच्या घटना कमी होतील असे वाटत होते़ मात्र एका पाठोपाठ एक याप्रमाणे पुन्हा घरफोडीचे सत्र सुरु झाल्याचे समोर येत आहे़ ते रोखण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे़ पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी स्वत: रात्रीची गस्त सुरु केली होती़ त्यामुळे सर्व अधिकाºयांसह कर्मचाºयांनी ही बाब गांंभिर्याने घेतली होती़ परिणामी घरफोडीचे सत्र तसे कमी होत असताना आता पुन्हा चोरट्यांनी आपले काम सुरु केले आहे़ चोºया, घरफोडीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांना आता सतर्क राहण्याची गरज असताना नागरीकांनी देखील आपल्या घराची काळजी घ्यायला हवी़ त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी