गोसावी कुटुंबाचा आधारच गेला! साक्री शहरावर शोककळा, बाप-लेकासह पुतण्याचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:41 IST2026-02-20T16:41:00+5:302026-02-20T16:41:54+5:30

पिंपळनेरमधील या रक्तरंजित घटनेत मृत्युमुखी पडलेले सुरेश सुपडूगिर गोसावी आणि त्यांचा एकुलता मुलगा साहिल गोसावी यांच्या जाण्याने गोसावी परिवार उघड्यावर पडला.

The Gosavi family's support is gone! Sakri city in mourning, death of nephew along with father and son | गोसावी कुटुंबाचा आधारच गेला! साक्री शहरावर शोककळा, बाप-लेकासह पुतण्याचा अंत

गोसावी कुटुंबाचा आधारच गेला! साक्री शहरावर शोककळा, बाप-लेकासह पुतण्याचा अंत

-विद्यानंद पाटील, साक्री 
Dhule Crime News: ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, तिथे आता फक्त हुंदके आणि आक्रोश ऐकू येत आहे. साक्री येथील जिल्हा बँक कर्मचारी सुरेश गोसावी हे लग्नाच्या लगबगीत व्यस्त होते. पण नियतीच्या मनात काही औरच होते. पिंपळनेरमधील त्या रक्तरंजित घटनेने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा कणाच मोडून टाकला आहे.

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले सुरेश सुपडूगिर गोसावी (५०) आणि त्यांचा एकुलता मुलगा साहिल गोसावी (३०) यांच्या जाण्याने गोसावी परिवार उघड्यावर पडला. घराचा कर्ता पुरुष आणि म्हातारपणाची काठी असलेला तरुण मुलगा, दोघांचेही मृतदेह एकाच वेळी पाहून साक्रीकरांच्या डोळ्यांत पाणी आले.

त्या माऊलीचा टाहो अन् सुन्न झालेली वस्ती

एकाच घरातून जेव्हा कर्ते पुरुष कायमचे निघून जातात, तेव्हा त्या घरातील महिलांच्या नशिबी जे अतीव दुःख येते, त्याची कल्पनाही करवत नाही. एका बाजूला पतीचा देह, तर दुसऱ्या बाजूला काळजाचा तुकडा असलेल्या मुलाचा मृतदेह... सुरेशच्या पत्नीचा आणि कुटुंबातील इतर महिलांचा आक्रोश ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी येत होते

कुटुंबाची वाताहतः कोण देणार आधार ?

सुरेश गोसावी हे जिल्हा बँकेत कार्यरत होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आणि कष्टाळू वृत्तीमुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता. साहिल हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता, ज्याच्या भविष्याची स्वप्ने सुरेश गोसावी यांनी पाहिली होती. आज या घरातील दोन्ही "कर्ते' पुरुष गेल्यामुळे मागे राहिलेल्या महिला आणि वृद्ध नातेवाईकांचे काय होणार? हा प्रश्न आहे.

Web Title : साक्री में शोक: गोसावी परिवार दुखद नुकसान से तबाह

Web Summary : पिंपलनेर में सुरेश गोसावी, उनके बेटे साहिल और भतीजे की असामयिक मृत्यु के बाद साक्री में शोक की लहर है। इस दुखद घटना ने परिवार को तोड़ दिया है और समुदाय शोक में है। परिवार के रोटी कमाने वालों के नुकसान से महिलाओं और बुजुर्ग रिश्तेदारों के भविष्य को लेकर चिंताएं बढ़ गई हैं।

Web Title : Grief in Sakri: Gosavi Family Devastated by Tragic Loss

Web Summary : A pall of grief has descended upon Sakri after the untimely death of Suresh Gosavi, his son Sahil, and nephew in Pimpleer. The tragic incident has left the family shattered and the community in mourning. The loss of the family's breadwinners has raised concerns about the future of the women and elderly relatives left behind.