विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST2021-04-23T04:38:36+5:302021-04-23T04:38:36+5:30

दोंडाईचात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांत त्यांचावर उपचार सुरू आहेत. काही होम क्वारंटाईन ...

Test the antigen of those who go out for no reason | विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट करा

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट करा

दोंडाईचात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांत त्यांचावर उपचार सुरू आहेत. काही होम क्वारंटाईन असलेले बाधित रस्त्यावर बिनधास्त फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे सुपर स्प्रेडर शोधून काढण्यासाठी संयुक्तपणे मोहीम राबविणे गरजेचे आहे.

शासनाने अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने अकरानंतर बंदचे आदेश पारित केले आहेत. तरीसुद्धा अकारण बरेचजण पायी, डबल सीट मोटारसायकलवर फिरताना दिसतात. रात्री ११ पावेतो हा प्रकार सुरूच असतो. बस स्टँड, राऊळ नगर चौफुली, नंदुरबार चौफुली, रोटरी एरिया, विविध कॉलनीत रस्त्यांवर ठेवलेली बाकडे या ठिकाणी जोरजोरात गप्पा मारणारे टोळके कोरोना वाहक होऊ शकतात. यांना पोलिसी हिसका दाखविणे महत्त्वाचे आहे. रात्रंदिवस पोलीस, आरोग्य, महसूल, नगरपालिका प्रशासन काम करीत असताना या रिकामटेकड्यांमुळे नियमांची पायमल्ली होत असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे कायदेशीर आहे. पोलिसांनी एकदा वचक निर्माण केला तर या भटकणाऱ्यांना वचक बसेल. ग्रामीण भागातील बरेचजण डबल, ट्रीपल सीट मोटारसायकलवर विनामास्क फिरताना दिसतात. दोंडाईचा शहरातील बरेच जण मास्क न वापरता फिरताना दिसतात. प्रशासनाने दोंडाईचात बिनधास्त अकारण भटकणाऱ्यांना आवर घालण्यासाठी त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट रस्त्यावरच करून रिपोर्ट लगेच देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

Web Title: Test the antigen of those who go out for no reason