शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.त १५ टक्के उपस्थितीची काटेकोरपणे अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:38 IST

कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयंकर आहे. यात मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून यावर नियंत्रण यावे ...

कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयंकर आहे. यात मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून यावर नियंत्रण यावे यासाठी राज्य शासनाने लॅाकडाऊन जाहीर केलेला आहे. कार्यालयांमध्येही गर्दी होऊ नये यासाठी सर्व व्यवस्थापनांना १५ टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे धुळे जिल्ह्यातील सर्वच आगारांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

सध्या एस.टी.ची सेवा मर्यादित सुरू आहे. अत्यावश्यक सेवेसाठीच एस.टी.चा वापर केला जात आहे. त्यामुळे चालक-वाहकांना रोटेशननुसार, ज्यांची ड्युटी असेल त्यांनाच कामावर बोलविण्यात येत आहे, तर इतर कर्मचाऱ्यांचीही १५ टक्के उपस्थिती आहे.

बसस्थानकात अथवा कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून केवळ १५टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती असते. शासन निर्णयाची अंमलबजावणी होते.

चालक-वाहकांना रोटेशनने ड्युटी

सध्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच बसेस सोडण्यात येत आहेत. त्यामुळे रोटेशननुसार ज्या चालक-वाहकांची ड्युटी आहे, त्यांनाच कामावर बोलविण्यात येत असते. इतर विभागातही १५ टक्केच उपस्थिती आहे.

- राजू भावसार

कर्मचारी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी होऊ नये म्हणून कार्यालयात १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे शासनाचे आदेश असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.

- मनीषा सपकाळ,

विभाग नियंत्रक, धुळे विभाग.