शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
3
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
4
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
5
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
6
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
9
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
10
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
11
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
20
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा बॅँकेतर्फे पीक कर्जवाटपास प्रारंभ

By admin | Updated: April 18, 2017 18:14 IST

धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेतर्फे आगामी खरीप हंगामाकरीता शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

 धुळे,दि.18- धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेतर्फे आगामी खरीप हंगामाकरीता शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. 31 मार्चअखेर ज्या शेतक:यांनी आपल्याकडील कर्जाची परतफेड केलेली आहे, त्यांना पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते बॅँकेच्या गरुड बागेतील मुख्य कार्यालयात एटीएम मशिनसह रुपे डेबिट कार्ड व शेतक:यांना रुपे किसान क्रेडिट कार्ड वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे होते. 

या प्रसंगी जिल्हा बॅँकेचे संचालक सुरेश रामराव पाटील, प्रभाकर चव्हाण हर्षवर्धन दहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
31 मार्चअखेर जिल्हा बॅँकेच्या दोन्ही जिल्ह्यातील मिळून 22 हजार 167 शेतक:यांनी मिळून प्रतिकूल परिस्थितीत 99 कोटी रुपयांचा चालू व थकीत कर्जाचा भरणा झाला. त्यात धुळे जिल्ह्यातील 15 हजार 805 चालू व थकीत कर्जदार सभासदांनी  65 कोटी तर नंदुरबार जिल्ह्यातील 6 हजार 362  सभासदांनी 34 कोटी रुपये कर्जाची परतफेड केली. सदर शेतकरी अभिनंदनास पात्र असल्याचे बॅँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी सांगितले. दोन्ही जिल्ह्यातील मिळून 22 हजार 167 शेतक:यांनी एकूण 99 कोटी रुपये थकीत कर्जाचा भरणा केला असून त्याची टक्केवारी 29 एवढी आहे.