शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

मुलबाळ होत नसल्यामुळे विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:26 IST

शिरपूर : साकवद येथील पतीसह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरपूर : तालुक्यातील साकवद येथील एका २५ वर्षीय विवाहितेला मुलबाळ होत नसल्यामुळे सासरील मंडळी त्रास देत होते़ या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याची घटना घडली़ याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह ५ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़मे २०११ मध्ये भाग्यश्री हिचे लग्न चेतन धनराज चव्हाण रा़साकवद ता़शिरपूर याचेशी करण्यात आले होते़ लग्नानंतर काही दिवसांनी तिला मुलबाळ होत नसल्यामुळे सासरे धनराज चव्हाण, सासु वंदनाबाई, आजलसासु, दीर विलास चव्हाण हे वारंवार तिला मानसिक त्रास देत होते़ मुलबाळ होण्यासाठी लागणाºया दवाखान्याचा खर्च भागविण्यासाठी सतत पैशांची मागणी केली जात होती़२८ रोजी संध्याकाळच्या सुमारास भाग्यश्री हिने विषप्राशन केल्याची माहिती फिर्यादी दीपक रघुनाथ कोळी रा़साळवे ता़शिंदखेडा यास जिजबहिण रूपाली विलास कोळी रा़साकवद हिने कळविली़ त्यामुळे दीपकसह काही आप्तजण लागलीच येथील उपजिल्हा रूग्णालयात आलेत, मात्र त्यापूर्वीच बहिण भाग्यश्रीचा मृत्यु झाल्याचे समजले़ सासरील मंडळीच्या त्रासाला कंटाळून तिने विष घेतले़  दरम्यान, घटनास्थळावरून सासरील मंडळी गायब झाली़ जोपर्यंत आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत प्रेत न घेण्याचा निर्णय माहेरील लोकांनी घेतला़ त्यामुळे २९ रोजी दुपारपर्यंत प्रेत न घेण्याचा निर्णय आप्तजणांनी घेतला़ अखेर पोलिस प्रशासनाने आरोपींना जेरबंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आाले़ मयताचा भाऊ दीपक कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिस ठाण्यात पती चेतन चव्हाण, सासरे धनराज चव्हाण, सासु वंदनाबाई, आजलसासु, दीर विलास चव्हाण सर्व राहणार साकवद यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भांदवि कलम ३०६, ४९८, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत आरोपी जेरबंद झालेले नव्हते़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी