शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

धुळे तालुक्यातील रस्ते, पूल, विजेचे प्रश्‍न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:33 AM

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने शासनाच्या विविध योजनेतून विकासाची कामे केली जात आहेत. मात्र, निधीअभावी अनेक कामे ...

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने शासनाच्या विविध योजनेतून विकासाची कामे केली जात आहेत. मात्र, निधीअभावी अनेक कामे प्रलंबित असून, काही कामांना नव्याने मंजुरी देणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील विकासकामांना प्राधान्य देत त्यांना निधी मिळावा, म्हणून आ.कुणाल पाटील यांनी थेट विधानभवनात अर्थसंकल्पिय अधिवेशनात आवाज उठविला. विधानभवनातील आपल्या भाषणात आमदार पाटील यांनी बोरी आणि पांझरा नदीवर पुलांच्या बांधकामाचा प्रश्‍न प्रभावीपणे मांडला. पावसाळ्यात या नद्यांना महापूर येतो, तेव्हा शेतकरी आणि नदीकाठावरील ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे पांझरा नदीवर जुने भदाणे ते नवे भदाणेच्या दरम्यान पूल, नेर चंदन टेकडी ते चिंचवार रस्त्यामध्ये पूल, बोरी नदीवरील निमगुळ ते नवे निमगुळ पूल, धामणगाव ते खोरदड दरम्यान पूल, विंचूर ते आदिवासी वस्तिदरम्यान पूल, मांडळ ते कुळथे या दरम्यान बोरी नदीवर पुलाचे बांधकाम होणे आवश्यक आहे. ही कामे त्वरित मंजूर करून निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. तालुक्यातील रस्ते राज्य निधीतून प्रस्तावित करण्यात आली असल्याने, अद्याप त्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली नाही, तसेच रस्ते दुरुस्ती व विकास ३०-५४ अंतर्गत एकही काम धुळे तालुक्यात मंजूर झालेले नाही. त्यामुळे धुळे ग्रामीणमध्ये रस्ते विकासाला गती देण्यासाठी ही कामे मंजूर करण्याचीही मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.