शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रोजी गेलेल्यांच्या पोटाची खळगी भरतेय शिवभोजनची रोटी; जिल्ह्यात मोफत थाळ्यांची संख्या वाढली दीड पटीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ब्रेक द चेनअंतर्गत शिवभोजन थाळी एक महिना नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेले आहेत. शिवभोजन केंद्रांच्या ...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ब्रेक द चेनअंतर्गत शिवभोजन थाळी एक महिना नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेले आहेत. शिवभोजन केंद्रांच्या थाळींची संख्या दीडपटीने वाढविण्यात आलेली आहे. हा वाढीव इष्टांक १५ एप्रिल ते १५ मे या एक महिन्याच्या कालावधीकरिता राहील. थाळ्यांची संख्या वाढवली असली, तरी खोटया नावाने तसेच त्याच त्या लाभार्थ्यांची छायाचित्रे शिवभोजन ॲपवर टाकली जाणार नाहीत, याची खबरदारी शिवभोजन केंद्रचालकांनी घ्यावी. असे आढळून आल्यास या केंद्रांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच केंद्र रद्द करण्यात येईल, असा इशारा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे. सर्व शिवभोजन केंद्रे ही सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवून गरजूंना पार्सल सुविधेद्वारे शिवभोजन उपलब्ध करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. लाॅकडाऊनमध्ये गरजूंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने महिनाभर मोफत शिवभोजन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच थाळ्यांची संख्यादेखील वाढवली आहे. यामुळे निराधार, गरजूंना आधार मिळाला आहे. त्यांच्या दोनवेळच्या भोजनाची चिंता मिटली आहे. परंतु या थाळ्या अपुऱ्या पडत असल्याची प्रतिक्रिया आहे. अनेक गरजूंना केंद्रावरून रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यामुळे थाळ्यांची संख्या आणखी वाढविण्याची गरज आहे.

जिल्ह्यात वाढल्या ६९३ थाळ्या

धुळे जिल्ह्यात १४ शिवभोजन केंद्रे आहेत. त्यात नियमित १ हजार ३८५ थाळ्या मंजूर आहेत. लाॅकडाऊनमध्ये एका महिन्यासाठी ६९३ थाळ्या वाढविल्या आहेत. केंद्राचे नाव, वाढीव थाळ्या अशा : धुळे एसटी कॅन्टीन १८८, पद्मशेखर शिवभोजन १५०, साधना राहुल कचवे १५०, साईराम शिवभोजन १५०, राजस्थानी महिला बचत गट १५०, कृषी उत्पन्न बाजार समिती १८८, बसस्थानकसमोरील २६३, साक्री येथे आर्यन स्वयंसहायता बचत गट ११३, भारती कांतिलाल माळी ११३, हिंदुस्थान स्पोर्टस् ज्युडो कराटे असोसिएशन ११३, शिंदखेडा येथे कस्तुरबा खानावळ १६५, शिरपूर येथे पप्पाजी की थाली ११३, अरिहंत गृह उद्योग ११३, मनोज भिका धनगर ११३ अशी वाढीव थाळ्यांची संख्या आहे.