शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मिल परिसरात पाण्याची तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST

शहरातील मिल परिसरात सलग सहावा आठवडा झाला असून, चार ते पाच दिवसांच्या उशिराने पाणीपुरवठा होत आहे. सुरुवातीला चार दिवसाआड ...

शहरातील मिल परिसरात सलग सहावा आठवडा झाला असून, चार ते पाच दिवसांच्या उशिराने पाणीपुरवठा होत आहे. सुरुवातीला चार दिवसाआड पाणीवितरण या भागात होत होते. पण, तांत्रिक अडचण पुढे करून पाणी वितरण केले जात नसल्याने नागरिकांचा संयम सुटल्याचे शुक्रवारी अधोरेखित होत आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कुठे नवव्या दिवसांनी पाणी आले. त्यानंतर तब्बल ११ दिवस उलटूनही पाणीच आलेले नाही. या भागातील नागरिकांना कोरोनापेक्षा आता पाण्याची सर्वाधिक चिंता भेडसावत आहे.

गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाण्याचा विषय चांगलाच गाजला होता. पाणी येत नसल्याने नागरिकांची नाराजी ओढवून घेतली जात असल्यामुळे नागसेन बोरसे यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा सज्जड दमच भरला. याच विषयाच्या अनुषंगाने अमोल मासुळे, शीतल नवले आणि अन्य नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर तातडीने नियोजन करून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुस्थितीत आणण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. पण, त्याच आश्वासनाचा शुक्रवारी मिल परिसरात पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. अखेर नगरसेवक अमोल मासुळे यांनी पुढाकार घेऊन मिल परिसरात पिण्याच्या पाण्याचे टँकर मागविले. पाण्याचा टँकर येताच अनेकांनी एकच झुंबड केली. लहान मुलांसह सर्वचजण भर उन्हात टँकरजवळ पाणी घेण्यासाठी गर्दी करू लागले होेते.

कोरोना पसरू नये म्हणून लाॅकडाऊन करून लोकांनी गर्दी टाळावी, घरात बसावे, लहान मुलांसह वयोवृद्धांनी तर घराबाहेर पडू नये असे आवाहन करीत संचारबंदी लावत आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या कृपेने मिल परिसरात नळाला ११ दिवस होऊनही पाणी आले नसल्याने सर्वच जण हातात भांडी घेऊन टँकरवरून पाणी आणण्यासाठी धावत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या भागात पाणीपुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे.

कोटसाठी

शहरातील प्रभाग १७ सह मिल परिसरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महापालिकेत सातत्याने भांडतो आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतदेखील आवाज उठविला होता. पाणीच येत नसल्यामुळे टँकर मागविण्यात आला. कोणत्याही प्रकारचे नियोजन प्रशासनाचे नाही यातून अधोरेखित होत आहे.

अमोल मासुळे, नगरसेवक, महापालिका.