शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
4
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
5
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
6
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
7
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
8
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
9
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
10
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
11
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
12
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
13
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
15
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
16
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
17
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
18
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
19
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
20
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यातील वडजाई येथील शाळा परिसर झाला मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:00 IST

जि.प.शाळेलगतच दारूभट्टी असल्याने मद्यपी रात्री शाळेच्या आवारातच मांडणात ठाण

आॅनलाइन लोकमतवडजाई (ता. धुळे) :येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिवसा भरते शाळा तर सायकांळी या शाळेच्या पंटागणात दारुड्यांची शाळा भरते. शाळेलगतच दारूअड्डे असल्याने, अनेक मद्दपी रात्री शाळेच्या पटांगणातच मद्दप्राशन करीत असतात. सकाळच्यावेळी पटांगणात गावठी दारूच्या बाटल्या, ग्लास पडलेले असतात. मोहाडी पोलिसानी दारूड्यांचा त्वरित बदोबस्त करावा अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांनी केलेली आहे.तालुक्यातील वडजाई येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेला मोठे पटागण आहे. मात्र हे पटांगण सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. संपूर्ण पटांगणाला संरक्षक भिंत नाही. या शाळेच्या आजुबाजुला गावठी दारूअड्डयांचा वेढा पडला आहे. अगदी शाळेलगतच गावठी दारूचे अड्डे असल्यामुळे रात्री दारु पिणारे या अडयावरून दारुच्या पोटली घेतात व शाळेच्या ओटयावर बसुन सर्रास दारु पित बसतात. मद्यप्राशनानंतर पिशवी, दारूची बोटल. ग्लास तेथेच सोडून निघून जातात. त्यामुळे सकाळी शाळेत येणाऱ्या लहान मुलांवर त्यांचा विपरीत परिणाम होतांना दिसून येत आहे.विशेष म्हणजे या आवारातच ग्रामपंचायत कार्यालय आहे, बालवाडी आहे. दिवसा या शाळेच्या परिसरात बराच वावर असतो परंतु रात्री आधाराचा फायदा घेऊन रात्री जणु बेवडयांची शाळाच भरत असते. जि प शाळेची शालेय समिती फक्त कागदावरच उरली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेला संरक्षक भिंत बांधावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आह. परंतु मराठी शाळेकडे वरिष्ठ अधिकारीच दुर्लक्ष करित असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी या दारूड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांनी केलेली आहे.शाळेचे प्रवेशद्वारही तुटलेलेदरम्यान शाळेला असलेले प्रवेशद्वारही तुटलेले आहे. त्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी स्थिती झालेली आहे. शाळेचे प्रवेशद्वार नवीन बसविण्यात यावे तसेच संरक्षक भिंत बांधावी अशी मागणीही आता होऊ लागलेली आहे.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण