शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

इतर धर्मियांचे गैरसमज दूर करा !

By admin | Updated: June 2, 2014 17:44 IST

गैरमुस्लिमांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपणावर असून स्वत:च्या चुका ओळखून प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांनी केले.

 

जळगाव : गैरमुस्लिमांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपणावर असून स्वत:मधील चुका ओळखून परस्पर स्नेह, सौहार्द आणि प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सैयद मोहम्मद राबे हसनी नदवी यांनी इदगाह मैदावर सायंकाळी ७.३0वा. आयोजित जाहीर सभेत बोलताना केले. व्यासपीठावर मौलाना उमरबीन महेफूज रहेमानी, मौलाना खालीद सैफुल्ला रहेमानी, मौलाना रफीक अहमद कासमी, दिल्ली, राज्यसभा सदस्य मोहम्मद आदिब, मौलाना सईद रहेमान कासमी, मुंबई, शेख हुसेन बदरी, मुंबई, मौलाना अनीसूर रहेमान कासमी, लखनऊ, मौलाना वसी अहमद कासमी, दिल्ली, मौलाना सऊद आलम कासमी, अलिगढ, मौलाना सनाउल्ला कासमी, पटना, रहीम कुरेशी, हैदराबाद, मौलाना सैयद मोहम्मद वली रहेमानी आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुराणच्या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. नदवी म्हणाले, सर्व गोष्टी अल्लाहच्या नियंत्रणात आहेत. त्याच्या इच्छेनुसार काहीही घडू शकते. त्यांच्या इच्छेनुसार आपण वागलो तर आपल्या परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. देशातील सर्व लोक एकसारखे आहेत. त्यामुळे मुस्लिमांना कुणी नुकसान पोहोचवू शकत नाही. ज्या लोकांसोबत राहतो, त्यांच्यामध्ये मुस्लिमांबद्दल अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. प्रत्येक धर्मीयाचा स्वाभिमान असतो. तो दुखावता कामा नये. आपल्यातील चांगल्या गोष्टी गैरमुस्लिमांना सांगितल्या पाहिजेत. या बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिल्यांदा स्वत:चे जीवन सावरा, त्याचबरोबर शांती, प्रेम आणि परस्पर स्नेहाच्या भावनेतून हिंदू धर्मीयांसोबत वर्तन करा, असे आवाहन त्यांनी केले. एक व्हा, नेक व्हा! झारखंडहून आलेल्या मुफ्ती हारून नदवी यांनी मुस्लिमांना एका व्यासपीठावर येण्याची साद घालून एक व्हा, नेक व्हा असे आवाहन केले. हजरत मौलाना खालीद सैफुल्ला रहमानी यांनी खोटे बोलणे अपराध आहे. परंतु परस्पर स्नेहभावासाठी, मने जोडण्यासाठी खोटे बोलण्यास हरकत नाही. मुस्लीम महिलांबरोबर हिंदू बहिणींची इज्जत आपली इज्जत आहे. त्यांचे रक्त आपले रक्त आहे, असे समजून वागा असे सांगितले. गफ्फार मलिक यांनी गैरमुस्लिमांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी, प्रेमाचा संदेश देण्यात आपण र्मयादित राहिलो तर तारीख आपल्याला माफ करेल. परंतु इतिहास कदापि माफ करणार नाही, असे सांगितले. त्याचबरोबर मौलाना असरारूल हक कासमी, मुफ्ती वसी अहमद, अब्दुल रहेमान कुरेशी यांनीही मार्गदर्शन केले.