शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा रेकी अन् रात्री हातसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:23 IST

गुजरातचे दोन तर धुळ्याचा एक जेरबंद : पोलीस अधीक्षक यांची माहिती

धुळे : शहरातील कॉलनी आणि गल्लींमध्ये विळी आणि अन्य लोखंडी साहित्याची विक्री करत असताना रेकी करायची़ बंद घर दिसल्यानंतर त्या भागात पाळत ठेवायची आणि रात्री घरफोडी करायची़ असा प्रकार गुजरातच्या शिकलकर टोळीने सुरु केला होता़ त्यांना मोराणे ता़ धुळे येथील तरुणाची साथ होती असे तपासात समोर आले़ घरफोडी करणाºया या तिघांना एलसीबीने ताब्यात घेतले आहे़ अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांचे पथक उपस्थित होते़ दिवाळीपासूनच चोरीचे प्रमाण वाढलेले होते़ ते रोखण्यासाठी कसोशिने प्रयत्न करीत असताना यश मिळत नव्हते़ चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविली होती़ ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली़ चोरट्यांना पकडण्याच्या विशेष सुचना स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार विभागाने गस्तीचे प्रमाण वाढविले़ ज्या ठिकाणी घरफोडी झाल्या आहेत त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेराचा आधार घेतला़ त्यानुसार तपास करीत धुळे तालुक्यातील मोराणे येथील तिरमलसिंग श्यामसिंग शिकलकर (३५) याला ताब्यात घेतले़ त्याची चौकशी केली असता सुरत येथील काही संशयित असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार, पथकाला सूचना करुन सुरत येथे सांगितलेल्या ठिकाणी सापळा लावण्यात आला़ यात सत्तुसिंग कारुसिंग भादा (१९) आणि ललकारसिंग जलसिंग शिकलीकर (२२) (दोन्ही रा़ प्रभू नगर, उधना, सुरत) या दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले़ दरम्यान, या तिघांची चौकशी केली असता अमरसिंग समशेरसिंग शिकलीकर आणि जसबीरसिंग (दोघेही रा़ गुजरात) यांच्या मदतीने घरफोड्या केल्या असल्याची कबुली पकडण्यात आलेल्या संशयितांनी दिली़ त्यांच्याकडून चोरीला गेलेला ४८ हजार ८५४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ पांडव प्लाझा, सिंधी कॉलनी येथील घरफोडीचा त्यात समावेश आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले आणि नथ्थू भामरे, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, संजय पाटील, अशोक पाटील, राहुल सानप, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, विलास पाटील, दीपक पाटील, महेश मराठे, मयूर पाटील, तुषार पारधी, किशोर पाटील, योगेश जगताप, सागर शिर्के यांनी ही कारवाई केली़ 

अन्य गुन्हे होऊ शकतात उघडचेनस्नॅचिंग करणारा संशयित तनवीरअली अकतरअली जाफरी (रा़ अमळनेर, जि़ जळगाव)  याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे़ त्याच्या चौकशीतून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़ साक्री आणि परिसरात घरफोडी करणारा संशयित किस्मतसिंग भादा याला देखील जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे़ धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने बैरागी नामक चोरट्यांची गँग जळगाव पोलिसांनी पकडली आहे़ चौकशीकामी त्यांना धुळ्यात आणले जावू शकते़ दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने ते ही रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ नागरीकांनी देखील आपल्या वाहनांची काळजी घ्यायला हवी़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस