शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलांचा रंगतोय गोट्यांचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. जीवनमरणाचा खेळ सुरू आहे. शाळा, कॉलेज सर्व ...

वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. जीवनमरणाचा खेळ सुरू आहे. शाळा, कॉलेज सर्व बद झाले आहे. मधल्या काळात विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे शिक्षणाचे धडे मिळत होते; परंतु ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांकडे महागडे मोबाईल नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे अभ्यासाचा ताण कमी झाला आहे. शाळा बंद, अभ्यास बंद असल्यामुळे मुलांपुढे टीव्ही पाहणे किवा खेळण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊन अभ्यासावरचे लक्ष विचलित होत आहे. गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे शाळेचे पटांगण मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण झाले आहे. अभ्यास नसल्यामुळे वडजाई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणात गोट्या-गोट्यांचा डाव रंगत आहे. हा डाव पाहून मोठी मंडळीही हाैस भागवून घेत आहेत.

कालबाह्य झालेले जुने खेळ कोरोनामुळे खेळताना लहान विद्यार्थी दिसून येत आहेत. लहान मुलांमध्ये सर्वांत प्रिय असलेला विटीदांडू, गोट्या-गोट्या, लगोरी, कबड्डी, आदी खेळ खेळले जात आहेत.

कालबाह्य झालेले खेळ खेळले जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांना त्यांचे विशेष आकर्षण आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे बालपणाचे दिवस आठवू लागले आहेत. मुलांचे शाळा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असले तरी या बिकट प्रसंगात ते तरी काय करणार, असा प्रश्न आहे. पालकांना मुलांच्या अभ्यासाची चिंता असली तरी हे त्यांचे खेळण्याचे वय आहे.