शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर व खान्देश एक्सप्रेस सुरु होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:46 IST

नेहमी गजबज असलेल्या दोंडाईचा रेल्वे स्थानकात शुकशुकाट

दोंडाईचा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दोंडाईच्यासह राज्यात २२ मार्चपासून प्रवाशी रेल्वे बंद आहेत. दोंडाईचा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या फक्त तीनच गाड्या थांबत आहेत. इतर गाड्या व खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद असल्याने स्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. प्रवाशांना पॅसेंजर, खान्देश एक्सप्रेस सुरु होण्याची प्रतीक्षा लागून आहे.सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर आठवड्यात पॅसेंजरसह लांब पल्ल्याच्या सुमारे ४० गाड्या धावतात. सद्यस्थितीत या प्रवाशी गाड्यांपैकी फक्त हावरा-अमदाबाद, छापरा-सुरत या लांब पल्ल्याच्या गाड्या दोंडाईचा स्टेशनवर थांबतात. सुरत-भुसावळ -सुरत, अमरावती पॅसेंजर, खान्देश एक्सप्रेस आदी सर्व प्रवाशी रेल्वे बंदच आहेत. त्यामुळे स्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. या भागातील प्रवाशांना या बंद असलेल्या सर्व प्रवाशी गाड्या सोयीस्कर आहेत.पूर्वी सर्वच प्रवाशी गाड्या सुरू असल्याने दोंडाईचा रेल्वे स्टेशनवर प्रवाशाची मोठी वर्दळ असायची. स्टेशनवर विविध कॅन्टीन आहेत. रेल्वेमुळे विविध किरकोळ विक्रेत्यांना रोजगार मिळत होता. स्टेशनवरुन प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रिक्षा, टेम्पो चालकांना रोजगार होता. सुमारे २०० अकुशल कारागिरांना रोजगार मिळाला होता. परंतू सद्यस्थितीत दोनच लांब पल्ल्याच्या प्रवाशी गाड्या सुरू असून लोकल सर्वच गाड्या बंद आहेत. खान्देशातून फक्त १४० रुपयात मुंबई येथे जाता येणारी खान्देश एक्सप्रेस बंद असल्याने प्रवाशांना ६०० ते ७०० रुपये खर्चून ट्रॅव्हल्सने मुंबईला जावे लागते. रेल्वेने फक्त ३० रुपयात सुरत जाता येते, तेथे आता बसने २०० रुपये मोजावे लागत आहेत. बसेस, ट्रॅव्हल्सचे उत्पन्न वाढले असले तरी दोंडाईचा रेल्वे स्टेशनवरील वर्दळ कमी झाल्याने विविध विक्रेत्यांचा रोजगार ठप्प झाला आहे.