दोंडाईच्यात आॅक्सिजन जनरेट सिस्टिम कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 08:25 PM2020-09-13T20:25:40+5:302020-09-13T20:25:54+5:30

आमदारांच्या उपस्थितीत आढावा बैठक । वैद्यकीय अधिकाऱ्यासह सर्व प्रमुख उपस्थित

Oxygen generating system will be operational in Dondai | दोंडाईच्यात आॅक्सिजन जनरेट सिस्टिम कार्यान्वित होणार

dhule

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : दोंडाईचा व परिसरात कोरोना बाधित अस्वस्थ रुग्णांना बाहेरून प्राणवायू पुरविण्याची गरज भागविण्यासाठी दोडाईचा उपजिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन निर्मिती करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्याचा निर्णय माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
कोरोनाचा वाढता संसर्ग बघता माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल यांनी आज आढावा बैठक घेतली .त्या बैठकीत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जुन नरोटे, शिंदखेडा कोविडं सेंटरचे डा.ॅ हितेंद्र देशमूख, भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, दोंडाईचा नगरपालिका आरोग्य सभापती मनीषा गिरासे यांचे सहाय्यक जितेंद्र गिरासे, भाजपा जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील, भाजपचे कामराज निकम, रोटरी क्लब आॅफ दोडाईचा सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया उपस्थित होते.
दोंडाईचा व परिसरात कोरोना बाधित संख्या वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिडं सेन्टर आहे. दररोज संख्या वाढत असतानाच कोरोना बाधित अस्वस्थ रुग्णाणा बाहेरून प्राणवायू ची गरज पण वाढत आहे.सद्य परिस्थितीत शासन ७० आॅक्सिजन सिलेंडर पुरविते,रुगणांची संख्या बघता हे सिलिंडर कमी पडत आहेत.त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक रुग्णवाहिकेची गरज भासू लागली आहे. उपजिल्हा रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी,परिचारिका असणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार रावल यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सांगळे यांच्याशी फोनने बोलून तात्काळ वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांची नेमणूक करण्याचे सुचविले.
सिलिंडरचा तुटवडा जाणूव नये यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणुन प्राणवायुचा निर्मितीचा छोटा प्रकल्पच मध्यवर्ती दोडांईचाला उभारुन त्याची सोय धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णांना होईल असे आमदार रावल यांनी सुचवल्यावर उपसंचालक यांनी सदर प्रकप चार आठवड्यात उभारुन कार्यान्वित करण्याचे आश्वासित केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Web Title: Oxygen generating system will be operational in Dondai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.