शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार मनपाच्या ‘रडार’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 22:30 IST

जप्तीची मोहीम लवकरच : विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांचीही असणार विविध पथक

धुळे : महानगर पालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील थकबाकीदारांवर जप्तीच्या कारवाईची विशेष मोहीम लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली़ दरम्यान, १० कोटी ३३ लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असल्याचे सांगण्यात आले़नगरपालिकेचे महानगर पालिकेत रुपांतर झाले़ शहराचाही विस्तार तसा वाढतच गेला़ शहराच्या चारही बाजुंनी मालमत्ता वाढत गेल्या आहेत़ त्यातील बºयाच जणांनी त्यांच्या मालमत्तेची नोंदणी प्रशासनाकडे केली़ आपल्याकडील थकबाकी देखील भरली़ असे असलेतरी बहुसंख्य जणांनी आपल्याकडील थकबाकी प्रशासनाकडे भरलेली नाही़ त्यांच्या माहितीचे संकलन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु झाले आहे़१ लाखांच्यावर ‘लक्ष’महापालिकेकडून नियमित मालमत्ता कर भरणारे आणि थकबाकीदारांच्या नावांच्या यादीचे संकलन करण्याचे काम सुरु आहे़ थकबाकीदारांच्या मालमत्तेची जप्ती करण्यापुर्वी सुरुवातीच्या काळात १ लाख आणि १ लाखांच्या वर असलेल्या मालमत्ताधारकांच्या नावांचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे़ त्यामुळे प्राथमिक स्तरावर अशांच्या नावांच्या यादीचे संकलन केले जात आहे़पथकाची होणार नियुक्तीमहापालिकेकडून सुरुवातीला १ लाख आणि १ लाखांच्या वर असलेल्या थकबाकीदारांकडून थकबाकीची रक्कम गोळा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्यामुळे त्याच्या वसुलीसाठी विशेष पथकासह विभाग प्रमुख आणि त्यांच्या सोबत काही कर्मचारी असे काही पथक तयार करण्यात येणार आहेत़ त्याचेही नियोजन आखले जात आहे़आकडेवारीची जुळवा जुळवमहापालिका हद्दीत किती मालमत्ताधारक आहेत, त्यातील किती नियमित कर भरणारे आणि थकबाकीदार किती, कोणाकडे किती रकमेची थकबाकी आहे, यासंदर्भात असलेल्या माहितीची अर्थात आकडेवारीची जुळवा जुळव आणि नावाची माहिती संकलित केली जात आहे़ या कामांसाठी मालमत्ता कर विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे़ कर्मचाºयांना नेमून दिलेल्या त्या त्या विभागांची माहिती त्यांच्याकडून संकलित केली जात आहे़ त्या माध्यमातून कोणाकडे किती रकमेची थकबाकी आहे, याची आकडेवारी गोळा होण्यास मदत मिळत आहे़नळ कनेक्शनही तोडणारथकीत मालमत्ताधारकांवर कारवाईचे अस्त्र उगारण्याचे काम सुरु होत असतानाच त्यांचे नळ कनेक्शन तोडले जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत़ अशांना १५ जानेवारीपर्यंतची अंतिम डेडलाईन देण्यात आलेली आहे़ त्यांनी या तारखेपर्यंत आपल्याकडील नळाची रखडलेली रक्कम भरणे त्यांना क्रमप्राप्त ठरणार आहे़ संबंधितांनी त्यांच्याकडील थकबाकी ही भरावी़ अन्यथा, नळकनेक्शन तोडण्यात येणार आहे़ तसेच तोडण्यात आलेले नळकनेक्शन पुन्हा त्याच्या जोडणीसाठी ५ हजारांचा दंड भरणे आवश्यक राहील़ तर त्यांचे नळकनेक्शन पुन्हा जोडण्यात येईल़मोबाईल टॉवरवरही होणार कारवाईशहरातील विविध भागांमध्ये मोबाईल कंपन्यांनी आपल्या टॉवरची उभारणी केली आहे़ दरवर्षी संबंधित मालमत्ताधारकांनी त्याचाही कर महापालिकेकडे भरणे आवश्यक आहे़ मात्र, असे कितीतरी मोबाईलचे टॉवरधारक आहेत त्यांच्याकडून मालमत्ता कर नियमित भरण्यात आलेला नाही़ या अनुषंगाने अशाही थकीत टॉवरची माहिती संकलित केली जात असून असे जवळपास ९९ असल्याचे प्राथमिक स्तरावर समोर आले आहे़ त्यांच्यापर्यंत थकीत रक्कम भरण्यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे़ मात्र, योग्य असा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संबंधितांवर कारवाईचे अस्त्र उगारण्यात येणार आहे़थकबाकीची वर्गवारीथकबाकी - ४ कोटी ६१ लाखचालू मागणी - २ कोटी १० लाखशास्ती - ३ कोटी ६२ लाखएकूण - १० कोटी ३३ लाख

टॅग्स :Dhuleधुळे