शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

देवपुरातील लूट प्रकरणी एक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:47 IST

चाकूचा धाक : मध्यरात्रीचा होता थरार

धुळे : देवपुरातील फरशी पुलावर चाकूचा धाक दाखवून लुट करणारा अवघ्या एका दिवसात पोलिसांच्या जाळ्यात अडकला़ त्यातील दुसरा संशयित फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे़ लुटीची घटना २२ मे रोजी मध्यरात्री घडली होती़ २९ मे रोजी रात्री गुन्हा दाखल झाला होता़शहरातील चितोडरोडवरील अण्णासाहेब पाटील नगरात राहणारा अक्षय संजय क्यावल (२१) या तरुणाने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, देवपुरातील जयहिंद नर्सिंग होमजवळील फरशी पुलावरुन २२ मे रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास दोन जणांनी त्याला अडविले़ चाकूचा धाक दाखवित जबरी लूट केली़ लुटारुंनी तरुणाकडे असलेला ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि ३०० रुपये रोख व पाकिटातील काही कागदपत्रे हिसकावून घेत पोबारा केला होता़ आरडाओरड करुनही कोणीही घटनास्थळी मदतीला येऊ शकला नाही़ भेदरलेल्या स्थितीनंतर अक्षय हा घरी गेला़ याप्रकरणी २९ मे रोजी रात्री साडेदहा वाजता त्याने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ भादंवि कलम ३९२, ५०६ (२), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़घटनेचा तपास देवपुर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी स्वत:कडे घेतला़ जबरी लूट कोण करु शकतो, याचा अंदाज घेऊन तपासाची चक्रे फिरविली आणि अवघ्या एका दिवसात संशयिताच्या मुसक्या आवळल्या़ त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे़ आता फरार संशयिताचा शोध सुरु आहे़

टॅग्स :Dhuleधुळे