सोशल माध्यम साक्षरता काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:05 IST2019-07-29T14:03:47+5:302019-07-29T14:05:44+5:30

सोशल माध्यम साक्षरता काळाची गरज मानवाने कालौघात तंत्रज्ञानाच्या मदतीने फार  मोठी प्रगती साधत आधुनिक जीवनशैलीची कास धरली आहे. कधी ...

The need for social media literacy | सोशल माध्यम साक्षरता काळाची गरज

सोशल माध्यम साक्षरता काळाची गरज

सोशल माध्यम साक्षरता काळाची गरज

मानवाने कालौघात तंत्रज्ञानाच्या मदतीने फार  मोठी प्रगती साधत आधुनिक जीवनशैलीची कास धरली आहे. कधी काळी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक साधनांचा अभाव आज अनेक बाबतीत आपल्या आवाक्यात आला आहे. दूरदर्शनच्या उपलब्धतेनंतर संगणक आणि अलीकडच्या  अँड्रॉइड मोबाईलमुळे सगळ्या तंत्रज्ञानाच्या बाबी अगदी सुलभ आपल्या हातात येऊन पोहचल्या आहेत. इंटरनेटमुळे तर माध्यमाच्या  माहितीची  देवाणघेवा अगदी जलद गतीने व्हायला लागली आहे. आज आपल्या शहरात व अगदी खेड्यापाड्यात सहजच महागडे अँड्रॉइड मोबाईल फोन उपलब्ध आहेत. या माध्यमातून अनेक सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून जगातील कुठलीही माहिती सेकंदाला आपल्यापर्यंत येऊन पोहचत आहे .एकप्रकारे माहितीचा भडीमारच सतत सुरु आहे. या सगळ्या बाबी हाताळताना मात्र माध्यमसाक्षरता ज्या प्रमाणात व्हायला हवी ती झालेली नाही. व्हाट्सअप, फेसबुक या सारख्या माध्यमातून संदेश किंवा माहितीची देवाणघेवाण करताना कुठलीही सत्यता आपण पडताळून पाहत नाही़ अनेक प्रकारच्या समाजविघातक बाबीबाबत ‘आलाय मेसेज करा फॉरवर्ड’ असा पवित्रा वापरकर्त्यांच्या दिसतो़ या बाबतीत सोशल माध्यम हाताळताना माहितीची पडताळणी व  सत्यता किती लोक तपासून पाहतात, हा मोठा प्रश्न आहे तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर ते वापरण्याच्या बाबतीतली साक्षरता व जागृती निर्माण होण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विधायक कामासाठी व्हावा़

 वसंत कुलकर्णी,
 धुळे

Web Title: The need for social media literacy

टॅग्स :Dhuleधुळे