शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माझे पप्पा ड्युटीवर आहे, तुम्ही घरी थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:50 IST

भावनिक साद : नोडल अधिकाऱ्यांच्या मुलीच्या मनातील भावना़

धुळे : ‘माझे पप्पा ड्युटीवर आहेत, कृपया त्यांच्यासाठी तरी तुम्ही घरातच थांबा’ असे भावनिक आवाहन जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांची नऊ वर्षीय मुलगी रिदीमा हिने केले आहे.सध्या कोरोनाचे थैमान सर्वत्र सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वैद्यकीय कर्मचारी कोरोनाशी दोन हात करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर माझे पप्पा रुग्णांवर उपचार करीत आहेत. तुम्ही घराबाहेर पडू नका असे भावनिक आवाहन रिदीमा पाटील हिने नागरिकांना केले आहे. पप्पा जेव्हा रोज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ड्युटीला जातो तेव्हा मला छान वाटते की तो कोण्या रुग्णाला बरे करायला जातोय़ पण, थोडी भीती पण वाटते. बाहेर असतांना त्याला तर काही होणार नाही ना.. तो दिवसभर कोरोनाच्या कामात व्यस्त असतो. पप्पा, आधी आम्हाला फोन करायचा, बोलायचा़ मात्र आता त्याला आमच्याशी बोलायलाही वेळ नसतो. अशी तक्रारही चिमुकली रिदीमा करते. तसेच पप्पा कोरोनाच्या कामानिमित्ताने घराबाहेर तरी पडतोय़ गेल्या २० दिवासांपासून ती घराबाहेरच गेली नसल्याचे सांगते. याक्षणाला घराबाहेर न जाणेच योग्य आहे. नागरिकांनाही घराबाहेर पडू नका असे आवाहन ती करते.पप्पा आमच्यासोबतखेळत सुध्दा नाहीपप्पा घरी आल्यानंतर आमच्यासोबत खेळत नाही. आधी तो माझी लहान बहीण तनू व माझ्यासोबत खेळायचा़ आम्हाला गोष्ट सांगायचा़ आता मात्र तो आम्हाला हात देखील लावत नाही. तो सतत बाहेर फिरत असल्यामुळे घरी आल्यानंतर आमच्यापासून लांब राहतो, असे लहानगी रिदीमा सांगते.आतातरी नागरीकांनी घरीच थांबावे असेही भावनिक आवाहन तिने पुन्हा केले आहे़जिल्हा रुग्णालयात ८० जणं कार्यरतआतापर्यंत जिल्हा रुग्णालयात १००० रूग्णांची स्क्रीनींग केली आहे़ त्यापैकी ५७ रुग्णांना पुढील तपासणीसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले होते. जिल्हा रुग्णालयात २० डॉक्टर, ४० परिचारीका, २० इतर कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांनी घरातच थांबून आम्हाला सहकार्य करावे, असे जिल्हा रुग्णालयातील कोरोना नोडल अधिकारी डॉ़ विशाल पाटील यांनी आवाहन केले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे