धुळ्यानजिक महामार्गावर केलेली सळईची परस्पर विल्हेवाट आली अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 09:48 PM2020-07-03T21:48:46+5:302020-07-03T21:49:07+5:30

सुरत जाण्यापुर्वीच हातसफाई : शहर पोलिसात नोंद, दोन संशयितांना केले जेरबंद

Mutual disposal of spears made on the highway near Dhule | धुळ्यानजिक महामार्गावर केलेली सळईची परस्पर विल्हेवाट आली अंगलट

धुळ्यानजिक महामार्गावर केलेली सळईची परस्पर विल्हेवाट आली अंगलट

Next

धुळे : नागपूर येथील टाटा स्टील यार्ड महेलगाव येथून लोखंडी सळई घेवून गुजरातकडे निघालेल्या ट्रक चालकाने नागपूर ते धुळे शहरातील सुरत बायपास पावेतोच्या प्रवासात अडीच लाख रुपये किंमतीची लोखंडी सळई परस्पर विकून तिची विल्हेवाट लावली़ त्यानंतर चालक ट्रक सोडून पसार झाला़ अशी घटना धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली़ याप्रकरणी दोन जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़
सीजी ०४ एचक्यू ९३९७ या ट्रकमध्ये नागपूर येथून ३९ टन ८५० किलो वजनाची लोखंडी सळई भरुन ती सुरत येथे घेऊन जात असताना ट्रक चालक राकेशसिंग इंदरजितसिंग (रा़ हरदुवा, मध्यप्रदेश) याने त्या सळईची रस्त्यातच कोठेतरी विल्हेवाट लावली़ २७ जून ते २ जुलै या कालाधीत ही घटना घडली़ इच्छितस्थळी भरलेला माल न पोहचविता मालकाचा विश्वासघात केला़ सळईची एकूण किंमत १८ लाख ५१ हजार ९३३ रुपये आहे़ त्यापैकी अडीच लाखांची सळईची ट्रक चालकाने परस्पर विल्हेवाट लावून रकमेचा अपहार करत पळून गेला आहे, अशी फिर्याद गुरुदिपसिंग ग्यानसिंग (५३, रा़ छत्तीसगड) या ट्रान्सपोर्ट मालकाने शहर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे़ घटनेचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत़
दरम्यान, परस्पर मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ मागील आठवड्यातही असा प्रकार पोलिसांनी उघड केला होता़
अवघ्या काही तासात दोन संशयित जेरबंद, चौकशी सुरु
फिर्याद दाखल होताच शहर पोलिसांच्या शोध पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले आहे़ गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरु झाली आहे़ पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, श्रीकांत पाटील, संतोष तिगोटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, प्रकाश पाटील, हेड कॉन्स्टेबल भिका पाटील, पोलीस कर्मचारी मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, रविंद्र गिरासे, कमलेश सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, राहुल गिरी, तुषार मोरे, सचिन साळुंखे, नरेंद्र परदेशी, नितीन अहिरे, निलेश पोतदार यांनी कारवाई केली़ गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल शहर पोलिसांच्या पथकाने जप्त केलेला आहे़ घटनेचा तपास सुरु आहे़

Web Title: Mutual disposal of spears made on the highway near Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे