ZP Election 2020: धुळ्यात भाजपाची सत्तेकडे वाटचाल, १९ जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 12:37 PM2020-01-08T12:37:19+5:302020-01-08T13:11:57+5:30

अद्याप मतमोजणी सुरु

Maharashtra ZP Election 2020: BJP returns to power in Dhule, 19 seats win | ZP Election 2020: धुळ्यात भाजपाची सत्तेकडे वाटचाल, १९ जागांवर विजय

ZP Election 2020: धुळ्यात भाजपाची सत्तेकडे वाटचाल, १९ जागांवर विजय

googlenewsNext

धुळे : जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. यात ५६ जागांपैकी २५ जागांचा निकाल हाती आला आहे. यात १९ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब लावला आहे. 

यामध्ये शिरपूर तालुक्यात ७, शिंदखेडा तालुक्यात ८, साक्री तालुक्यात ३ आणि धुळे तालुक्यात १ याप्रमाणे १९ जागांवर विजय संपादन केला. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी २ जागा तर शिवसेनेने १ जागा मिळविली आहे. याशिवाय अपक्ष १ उमेदवार यात विजयी झाला आहे. उर्वरीत ठिकाणी मतमोजणी सुरु आहे.

दरम्यान, आज धुळ्यासह पालघर, नागपूर, , नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. धुळ्यात जिल्हा परिषदेच्या ५१ गटांसाठी २१६ उमेदवार, तर ११० गणांसाठी ३९७ उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: Maharashtra ZP Election 2020: BJP returns to power in Dhule, 19 seats win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.