शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यानजिक टँकरमधून लांबविला ५ टन ६० किलो वजनाचा एलपीजी गॅस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 22:43 IST

मोहाडी पोलिसात तिघांविरुध्द गुन्हा, संशयित फरार

धुळे : मुंबईकडून जळगावच्या दिशेने जाणारा एलपीजी गॅसच्या टँकरमधून शिताफिने गॅस चोरी करण्यात आली़ हा प्रकार मालकाने केलेल्या उलट तपासणीतून प्रकर्षाने समोर आला आहे़ टँकरमधील दोन चालक आणि एक सहचालक यांनी ५ टन ६० किलो वजनाचा १ लाख ६७ हजार रुपये किंमतीचा गॅस चोरुन घेतल्याचे तपासातून समोर आले़ गॅस टँकर या तिघांनी पळ काढला असून मोहाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात शुक्रवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, तिघे संशयित फरार झाले आहेत़एमएच ०४ एचएस १२८९ क्रमांकाचा टँकर मुंबईकडून जळगावच्या दिशेने निघाला़ या टँकरमध्ये एलपीजी गॅस भरलेला होता़ चालक मिर्झा आझाद बेग (रा़ धिमा बदलापूर, जुनापूर), नफिज अहमद मोहम्मद ईसा (रा़ पितुकूली, सतपुरा, प्रतापगढ, उत्तरप्रदेश) आणि क्लिनर इम्रान खान (रा़ प्रतापगढ, उत्तरप्रदेश) हे तिघेही त्या टँकरमध्ये होते़ २९ जून रोजी हा टँकर एलपीजी गॅस घेवून मुंबई येथून जळगावच्या दिशेने निघाला़ धुळ्यापर्यंत येत असताना या टँकरमधून परस्पर या तिघांकडून गॅसची चोरी केली जात असल्याचा अंदाज टँकर मालकाला आला़ त्यानुसार, त्याने अचानक टँकर धुळ्यानजिक अडविला़ त्यानंतर गॅसची तपासणी करण्यास सुरुवात केल्यानंतर आपले पितळ उघडे पडेल असे कळताच या तिघांनी पळ काढला़ हे तिघे पळून गेल्याने टँकर मालक हरशरणसिंग जोगिंदरसिंग भाटीया (५३, रा़ टागोरनगर, विक्रोळी ईस्ट, मुंबई) यांचा संशय अधिक बळावला़ चोरीचा हा प्रकार २९ जून रोजी सकाळी ६ वाजून २० मिनीटांपासून ते १ जुुलै रोजी (वेळ नक्की माहिती नाही) या कालावधीत घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजिक हा टँकर पकडण्यात आल्यामुळे मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली़ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येवून टँकर पोलिसांनी जप्त केला़ या टँकरमध्ये भरण्यात आलेला गॅस आणि चोरी झालेला गॅस यांचा ताळमेळ साधण्यात आला असता त्यात चोरी झाल्याचे प्रकर्षाने समोर आले़ या टँकरमधून एलपीजी गॅस ५ टन ६० किलो वजनाचा गॅस चोरून त्याची परस्पर विक्री केल्याचे समोर आले़ चोरीला गेलेला गॅसची किंमत १ लाख ६७ हजार रुपये इतकी आहे़ चोरीला गेलेला गॅसची प्रति किलो ३२ रुपये ९० पैसे इतकी किंमत आहे़टँकर मालक हरशरणसिंग जोगिंदरसिंग भाटीया यांनी २ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, चालक मिर्झा आझाद बेग (रा़ धिमा बदलापूर, जुनापूर), नफिज अहमद मोहम्मद ईसा (रा़ पितुकूली, सतपुरा, प्रतापगढ, उत्तरप्रदेश) आणि क्लिनर इम्रान खान (रा़ प्रतापगढ, उत्तरप्रदेश) या तिघांविरुध्द भांदवि कलम ४२०, ४०७, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे