शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साडेपाच लाख घरांची माहिती घेतली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:32 IST

आर्थिक जनगणना : सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

धुळे : जिल्ह्यात केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सातव्या आर्थिक गणनेस प्रारंभ झाला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ८१२ शहरी व ३ लाख ३५ हजार ७७१ ग्रामीण असे ५ लाख ३१ हजार ५८३ एवढ्या गणना घरांची माहिती घेण्यात येईल. त्यासाठी ७१२ प्रगणक व २८३ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.शासनास विविध बाबींसंदर्भात धोरण ठरविण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून आर्थिक गणना आयोजित केली जाते. निरनिराळे लघुउद्योग, सेवा, लघु निर्मिती संस्था, आर्थिक उपक्रम आदींचा अर्थव्यवस्थेतील वाटा, त्यात कार्यरत असलेले कामगार, गुंतवणूक, यंत्रसामग्री तसेच विविध भौगोलिक क्षेत्रानुसार त्यांचे प्रकार, वैशिष्ट्ये यांचा समग्र अभ्यास होण्यासाठी मूलभूत माहिती एकत्रित करणे हा आर्थिक गणनेचा महत्वाचा उद्देश आहे.सातव्या आर्थिक गणनेत प्रथमच ही गणना एका कंपनीमार्फत करण्यात येईल. तसेच ही गणना माहिती तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर म्हणजेच आॅनलाइन मोबाईल अप्लिकेशनद्वारे करण्यात येईल. त्यामुळे डाटा कलेक्शन व डाटा एन्ट्री या दोन्ही बाबी एकाच वेळी होतील.या गणनेसाठी प्रगणकांना ओळखपत्र देण्यात आले आहे. तसेच ग्राम पातळीवर ग्रामसेवक, तलाठी सहकार्य करतील, तर पोलिस ठाण्यांनाही सातव्या आर्थिक गणनेबाबत प्रगणक गावागावांत जातील, असे कळविण्यात आले आहे. आर्थिक गणनेबाबत अधिक माहिती आवश्यक असल्यास नागरिकांनी जिल्हा सांख्यिकी कार्यालय अथवा सीएससी प्रतिनिधींशी कार्यालयीन वेळेत जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रतिनिधींनी नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करून शासनाच्या कार्यक्रमात योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे