शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
3
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
4
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
6
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
7
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
8
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
9
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
10
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
11
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
12
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
13
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
14
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
15
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
16
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
17
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
18
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
19
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
20
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
Daily Top 2Weekly Top 5

कजर्माफी न दिल्यास मंत्र्यांच्या गाडय़ा रोखणार

By admin | Updated: April 24, 2017 23:39 IST

काँग्रेसचा महामोर्चा : धडगावात एकवटले हजारो आदिवासी बांधव

धडगाव : राज्य आणि केंद्र शासनाने शेतक:यांना कजर्माफ न केल्यास येत्या काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार व मंत्री यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा आमदार अॅड़ क़ेसी़ पाडवी यांनी दिली़ धडगाव येथे झालेल्या महामोर्चादरम्यान मार्गदर्शन करताना आमदार पाडवी यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकार हे दलित व आदिवासी विरोधी असल्याचा आरोप केला़ मोर्चादरम्यान उपस्थितांनी पारंपरिक आदिवासी पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सवाद्य अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार केल़े
या महामोर्चाला आमदार क़ेसी़पाडवी, हारसिंग पावरा, विक्रम पाडवी, सुनील पाडवी, धडगाव नगरपंचायत नगराध्यक्षा अहिल्याबाई पावरा, उपनगराध्यक्ष मतीन कुरेशी, जामसिंग पराडके, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, माजी सभापती विजयाबाई पावरा,  महिला व बालकल्याण सभापती हिराबाई पाडवी, रूपसिंग तडवी, रवींद्र पाडवी, सी़क़ेपाडवी, रामसिंग वळवी, प्रताप वसावे, जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, चांद्या पाडवी, लताबाई पाडवी, बुटीबाई पाडवी, योगिता वळवी, गीताबाई पाडवी, थिक्या वसावे, नटवर पाडवी यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पोलीस पाटील, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह हजारो आदिवासी बांधव उपस्थित होत़े धडगाव शहराच्या विविध भागातून काँग्रेसचे ङोंडे हाती घेतलेले पटके गळ्यात टाकलेले शेकडो कार्यकर्ते सकाळपासून दिसून येत होत़े
धडगाव शहरातील बैल बाजार आमराई येथून सुरू झालेला हा मोर्चा वनविभाग मार्गाने तहसील कार्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या सभास्थळार्पयत नेण्यात आला़ तेथून शिष्टमंडळाने तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार श्याम वाडकर व प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े यानंतर पंचायत समितीसमोर जाहीर सभा घेण्यात आली़ या सभेच्या प्रारंभी याहामोगी माता आणि संविधानाच्या प्रतिचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आल़े  यानंतर दुर्गम भागातून आलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आदिवासी समाजाबाबत फडणवीस सरकार हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचे आरोप करत आदिवासींच्या हक्कांसाठी यापुढे लढा कायम ठेवला जाईल, असे सांगितल़े     (वार्ताहर)