शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

कौठळला पार पडला आदर्श विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 22:13 IST

सोशल डिस्टन्सिंग पाळले : कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत २१ हजारांची मदत

धुळे : देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे आपला नियोजित विवाह सोहळा साध्या पध्दतीने पार पाडत कौठळ ता़ धुळे येथील नव दाम्पत्याने कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत २१ हजारांचा धनादेश देवून आदर्श निर्माण केला आहे़कौठळ येथील शिक्षिका मिनाक्षी आणि कैलास रंगराव भामरे यांचे सुपूत्र कमलेश आणि शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील रमेश दत्तू पवार यांची कन्या कल्याणी यांचा कौठळ येथे रविवारी दुपारी अत्यंत साध्या पध्दतीने विवाह सोहळा पार पडला़ या विवाह सोहळ्यात लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले़ विवाह सोहळ्याला उपस्थित मोजक्या वºहाडींनी मास्क लावले होते़ विशेष म्हणजे भटजींनीही मास्क लावून मंगलाष्टके म्हटली़या विवाह सोहळ्याला धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़ कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २१ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय दोन्ही पक्षाकडील वºहाडींनी घेतला़ नव दाम्पत्याने २१ हजार रुपयांचा धनादेश आमदार पाटील यांच्याकडे सुपूर्द केला़ आमदार पाटील यांनी नव दाम्पत्याचे कौतुक केले़कोरोनाच्या आपत्तीमुळे नाहक खर्चाला फाटा देत साध्या पध्दतीने विवाह करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतल्याने या आदर्श विवाह सोहळ्याचे गावकऱ्यांनीही कौतुक केले असून सर्वत्र चर्चा सुरू आहे़

टॅग्स :Dhuleधुळे