शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन केंद्रातून भागतेय गरीबांची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:18 IST

लॉकडाऊननंतरची स्थिती : ठाकरे सरकारची योजना ठरतेय ‘अन्नपूर्णा’

धुळे : दिवसभर काम केल्यानंतर रातच्याला घरची चूल पेटेल, आपल्या मुलाबाळास्नी, घरच्या लोकास्नी दोन घास जेवता येईल या विचाराने एरवी राब राब राबणाऱ्या कामगाराचा सध्या लॉकडाऊनमुळे आर्थिक गाडा थांबलाय. अश्या या गोरगरीब, गरजू जनतेची उपासमार होऊ नये म्हणून ठाकरे सरकारची महत्वाकांक्षी असलेली शिवभोजन थाळी लॉकडाऊनच्या काळात या गोरगरीबांसाठी ‘अन्नपूर्णा’ ठरत आहे.दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं १० रुपयांऐवजी ५ रुपयांत शिवभोजन थाळी मिळेल असं जाहीर केल्यानंतर धुळ्यात काही शिवभोजन केंद्र चालक गोरगरीब, गरजू नागरिकांना मोफत जेवण देत आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.शट डाऊनमुळे हातावर काम करणाऱ्यांची उपासमार होत आहे. त्यांनी उपासी राहू नये यासाठी राज्य सरकारनं शिवभोजन थाळीचा दर १० रुपयांवरून ५ रुपये केला. एरवी दुपारी १२ ते २ यावेळेत सुरु राहणारं शिवभोजन केंद्र सध्या सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सुरु राहत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टनिंगच पालन, तसेच शासनाच्या सूचनांप्रमाणे योग्य ती दक्षता देखील याठिकाणी घेण्यात येतेय.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थाळीत जेवण न देता पॅकिंग स्वरूपात जेवण देण्यात येतंय. यात भाजी, पोळी, दाल , भात यांचा समावेश आहे. नागरिक घराबाहेर निघत नसल्यानं याचा परिणाम शिवभोजन केंद्रावर झाला असला तरी सध्याच्या परिस्थितीचा विचार करता हा प्रतिसाद चांगला असल्याचं शिवभोजन केंद्र चालक सांगतात. तर जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी देखील शिवभोजन केंद्रात सध्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगतात़

टॅग्स :Dhuleधुळे