धुळ्यात प्रदूषणमुक्त दिवाळी उपक्रमात योगदान देणाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 09:01 PM2019-11-14T21:01:00+5:302019-11-14T21:01:18+5:30

निसर्ग मित्र समितीची उपक्रम : पक्षी सप्ताहाचा झाला समारोप, अनेकांची होती उपस्थिती

Honor of those who have contributed to the pollution free Diwali initiative in Dhule | धुळ्यात प्रदूषणमुक्त दिवाळी उपक्रमात योगदान देणाऱ्यांचा सत्कार

धुळ्यात प्रदूषणमुक्त दिवाळी उपक्रमात योगदान देणाऱ्यांचा सत्कार

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे : निसर्गमित्र समितीतर्फे निसर्ग संवर्धनासह प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात योगदान देणाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
निसर्गमित्र समितीतर्फे प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान तसेच पक्षी सप्ताहचे आयोजन केले होते. निसर्ग संवर्धन, राष्ट्रीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रदुषणमुक्त दिवाळी अभियानात उल्लेखनीय योगदानाबद्दल धुळे पंचक्रोशीतील निसर्गप्रेमींचा गौरव करण्यात आला.
पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक वनिकरण विभागाच्या उपसंचालक रेवती कुलकर्णी होत्या. व्यासपीठावर समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, प्रदेश सचिव संतोष पाटील, उद्योजक किशोर डियलानी, मनीषा डियलानी, गोपीचंद पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास पाटील, डॉ.विनोद भागवत, नरेश अहिरे उपस्थित होते.
या समारंभात विश्वास पगार (विखरण), प्राचार्य आर.ए. पाटील , लता पाटील, (दोन्ही कापडणे), प्राचार्य आर. जे. पाटील (अजंग), प्राचार्य पी. के.पाटील, प्रा.डॉ प्रविणसिंग गिरासे (धुळे), मंदाकिनी शिरसाठ (अस्ताणे), प्रा.जयवंत भामरे (मेहेरगाव), शाहिर विजय वाघ, आर.आर. सोनवणे (बेटावद), संतोष इंडाईत व रामलाल जैन याना सपत्निक सन्मानित करण्यात आले. उद्योजक पक्षीप्रेमी किशोर डियालाणी यांना उद्योजक प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Honor of those who have contributed to the pollution free Diwali initiative in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे