शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झालेला शेतीमाल शासनाने नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 21:52 IST

धुळे : भरड धान्यासह कडधान्याला शासनाने हमीभाव दिला खरा; परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झालेले धान्य खरेदी करण्यास शासनाने नकार ...

धुळे : भरड धान्यासह कडधान्याला शासनाने हमीभाव दिला खरा; परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झालेले धान्य खरेदी करण्यास शासनाने नकार दिल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले. धान्याचा दर्जा ठरविल्याने हमीभाव केवळ कागदावरच राहिला. मूग, उडीद आणि सोयाबीनला शासनाने अनुक्रमे ७ हजार, ६ हजार आणि ३८०० रुपयांचा भाव दिला होता. त्या तुलनेत मूग आणि उडिदाला ८ हजार तर सोयाबीनला ४ हजारापेक्षा अधिक बाजारभाव होता; परंतु अतिवृष्टीमुळे पिकांना पाणी लागल्याने धान्य खराब झाले होते. असे असताना एफएक्यू दर्जाचे अर्थात  केवळ उच्च प्रतीचे धान्य हमीभावाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या धान्याची खरेदी शासनाने केली नाही. खराब झालेले धान्य शेतकऱ्यांना बाजारात कवडीमोल भावात विकावे लागले. त्यांचा उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. सोयाबीनला बाजारात जास्त भाव होता. शासनाने हमीभाव कमी दिला होता.दरम्यान, ज्वारी, बाजरी आणि मका खरेदी सध्या सुरू आहे. अनुक्रमे २६२० रुपये, २१०० रुपये आणि १८५० रुपये हमीभाव दिला आहे. बाजारभावापेक्षा अधिक हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला. धुळे तालुक्यात ८०० क्विंटल ज्वारी, ६५० क्विंटल बाजरी आणि ६ हजार क्विंटल मक्याची खरेदी झाली आहे. शिरपूर तालुक्यात २३६२ क्विंटल मका खरेदी झाला आहे. ज्वारी आणि बाजरीची खरेदी बाकी आहे. नोंदणी मात्र झाली आहे. शिंदखेडा तालुक्यात ६ हजार ५४३ क्विंटल मका, १३ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. बाजरीसाठी २१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्याची खरेदी अजून व्हायची आहे. शासनातर्फे हमीभावाने खरेदी सुरू असली तरी ज्वारी, बाजरी आणि मक्याचादेखील दर्जा शासनाने ठरवला आहे. पाणी लागलेले धान्य शासनाने नाकारल्याने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पावसामुळे कापूस पिकाचेदेखील मोठे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यात कापूस हाती आला; परंतु सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने उशीर केला. त्याआधी खासगी व्यापाऱ्यांनी साडेपाच हजाराच्या भावाने कापूस खरेदी सुरू केली होती; परंतु व्यापारी काटा मारुन शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच वाईट अनुभव येतो. ज्यावेळी शेतकरी कांदा विक्रीसाठी जातो त्यावेळी त्यांचा कांदा कवडीमोल भावाने व्यापारी खरेदी करतात. त्यानंतर साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करीत तोच कांदा ५० ते १०० रुपये किलो दराने विकला जातो. सध्या किरकोळ बाजारात ३० ते ५० रुपये किलो भाव आहे; परंतु बाजार समितीमध्ये मात्र सोमवारी वसमार येथील शेतकऱ्याचा कांदा २१ रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला.

टॅग्स :Dhuleधुळे