शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 23:46 IST

Dhule News: मुंबई येथील व्ही. एम. ज्वेलर्सचे दोन कर्मचारी विनय मुकेश जैन आणि किशन मोदी यांना बुधवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील वीर सावरकर चौकात बसमधून खाली उतरल्यावर लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत सोन्याने भरलेली बॅग हिसकावून नेली.

धुळे -  मुंबई येथील व्ही. एम. ज्वेलर्सचे दोन कर्मचारी विनय मुकेश जैन आणि किशन मोदी यांना बुधवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील वीर सावरकर चौकात बसमधून खाली उतरल्यावर लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत सोन्याने भरलेली बॅग हिसकावून नेली. बॅगेत तीन किलो सोन्याचे दागिने असल्याचे ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. विनय जैन आणि किशन मोदी हे दोघे सोन्याच्या दागिन्यांचे सॅम्पल घेऊन मुंबई येथून शहादा येथील व्यापाऱ्यांना ते दाखवण्यासाठी गेले होते. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते बस क्रमांक एमएच ४० एन ९०२१ ने धुळ्याकडे निघाले. रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी ते धुळ्यातील वीर सावरकर चौकात बसमधून उतरले. बसमधून उतरताच एका दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.

तीन दरोडेखोरांपैकी एकाने हवेत गोळीबार करत विनय जैन यांच्या हातातून सोन्याची बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर ते तिघे दरोडेखोर श्री एकविरा देवी मंदिरासमोरून बिलाडी मार्गे फरार झाले. ही घटना इतक्या वेगाने घडली की, दरोडेखोरांचे चेहरेही पाहता आले नाहीत, त्यांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या,असे पीडित कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस दलात खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीराम पवार यांच्यासह पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, दरोडेखोर देवपूर पोलिस ठाण्यासमोरूनच बिलाडी मार्गे फरार झाले.

दरम्यान, पोलिसांचे पथक वीर सावकर चौकात ज्याठिकाणी हवेत गोळीबार झाला, तेथे गोळ्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच दरोडेखोर ज्या मार्गाने पळाले, त्यामार्गावर पोलिस पथक रवाना झाले आहे. रात्री उशिरापर्यंत देवपूर पोलिस स्टेशनला पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत त्या दोघी कर्मचाऱ्यांची विचारपूस करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे